Rice Price Increase: 25 किलो तांदूळ पोत्यामागे 200 रुपयांची वाढ

Rice Price Increase: आणखी दरवाढीची भीती: विविध राज्यांत पावसाअभावी उत्पादनात घट
Rice Price Increase
Rice Price IncreaseDainik Gomantak
Published on
Updated on

Rice Price Increase: दुकानातून तांदूळ खरेदी करण्याशिवाय पर्याय नसणाऱ्या नागरिकांना आता 25 किलोच्या पोत्यामागे 200 ते 300 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

अगोदरच महागाईमुळे जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव वाढत आहेत, परंतु सर्वसामान्यांसाठी भात अन्नपदार्थ महत्त्वाचा असल्याने त्यांना अधिक रक्कम देऊन तांदूळ खरेदी करावे लागणार आहे.

Rice Price Increase
Goa Highway: भोम महामार्ग रुंदीकरण; लोकांना विश्‍वासात घ्यावे

भात उत्पादन घेणाऱ्या राज्यांत अवकाळी पावसाने दिलेला दणका आणि काही ठिकाणी पिकाला योग्य वेळी न मिळालेले पाणी याचा परिणाम या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे सध्या बाजारात असलेल्या तांदळाची मागणी वाढली आहे, परिणामी त्याच्या दरात वाढ झालेली दिसून येते. दरम्यान, उत्पादनात घट झाल्यास तांदळाचे दर वाढण्याची शक्यता घाऊक व्यापारी महेंद्र भगत यांनी व्यक्त केली आहे.

पोत्याचे दर

बासमती १५०० ते १७५०

कोलम १३०० ते १५००

रायभोग १२०० ते १४००

तूरडाळ महागली

अवर्षण-प्रवण भागात तूरडाळीच्या उत्पादनासाठी आवश्‍यक पाऊस न झाल्याने तूरडाळ उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात अद्याप हव्या त्या प्रमाणात तूरडाळीची आवक होत नसल्याने गोव्यात येणाऱ्या तूरडाळीचा दर किलोमागे १६० व १८० रुपये इतका आहे.

त्यात उंची व दुय्यम तसेच पॉलिश केलेली आणि विना पॉलिश असे तूरडाळीचे प्रकार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com