..त्यामुळं टीएमसी, आपचा फक्त भाजपलाच फायदा; नितीन गडकरी

तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष भाजपला खूप मदत करतात कारण शेवटी ते..
Nitin Gadkari
Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

तृणमूल काँग्रेस (TMC) आणि आम आदमी पार्टी (AAP) गोव्यात काँग्रेसची मते कमी करून भाजपला मदत करत आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी सांगितले. गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना गडकरी म्हणाले की, टीएमसी आणि आपच्या गोव्यातील प्रवेशाचा फक्त भाजप पक्षालाच फायदा होऊ शकतो. तसेच भाजप बहुमताचा आकडा पार करेल आणि त्यासाठी गोव्यातील जनता 14 फेब्रुवारीला मतदान करणार आहेत तसेच 10 मार्च रोजी निकाल जाहीर होतील आणि भाजप आपले सरकार स्थापन करेल.

Nitin Gadkari
डिचोली-मयेत भाजपची प्रतिष्ठा पणाला, नगरसेवक कोणाबरोबर?

गोवा निवडणुकीत नवोदित टीएमसीच्या भूमिकेबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, "तृणमूल काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्ष भाजपला खूप मदत करतात कारण शेवटी ते काँग्रेसचा मतसंख्या कमी करत आहेत. गोव्यात भाजपचा एकमेव विरोधी काँग्रेस आहे. आणि आम्ही निश्चितपणे सत्तेत परत येऊ."

2017 च्या निवडणुकीनंतर भाजपवर टीएमसीने (TMC) हॉर्सट्रेडिंगवरुन आरोप केले होते. आरोपांना प्रत्युत्तर देताना मंत्री म्हणाले, "कोणतीही हॉर्सट्रेडिंग नव्हती. फक्त समज होती, ज्याच्या आधारे आम्ही विशिष्ट आमदारांना मंत्रीपद दिले. जे पक्ष अपयशी ठरतात किंवा गोव्यात सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहेत ते असे आरोप करत आहेत."

Nitin Gadkari
..म्हणून लागलंय पणजी मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष

पुढे बोलताना ते म्हणाले की, गोव्यात सोयीचे राजकारण (Politics) चालते, त्यामुळे कोणताही पक्ष निवडणूकोत्तर युती करू शकतो.

"राजकारण हा तडजोडी, मजबुरी, मर्यादा आणि विरोधाभासांचा खेळ आहे. कोणत्याही टप्प्यावर, संख्येच्या आधारावर, तुम्हाला पर्याय आणि उपाय सापडू शकतात. निवडणुकीनंतरच्या युतीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, भाजप (BJP) गोव्यात निश्चितपणे परत येईल," अस मत यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com