IMD Goa: थंडीचा कडाका वाढला; 'हे' दोन दिवस गोव्यात पावसाची शक्यता

हवामान वेधशाळेने वर्तवला अंदाज
weather update
weather updateDainik Gomantanta
Published on
Updated on

गोवा राज्यात सध्या सकाळी थंडीचा कडाका वाढला आहे तर दुपारी ऊन असल्याची स्थिती आहे. यातच आता दोन दिवस मेघ गर्जेनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तवला आहे.

( thundershowers very likely at isolated places on 9th and 10th Dec in goa)

weather update
Bicholim: भरधाव बसने पादचाऱ्याला दिली धडक; एक गंभीर जखमी

हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार 7 आणि 8 डिसेंबर रोजी धुके पडण्याची शक्यता आहे. तर 9 आणि 10 डिसेंबर 2022 रोजी गोवा राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे थंडी जाणवत असतानाच आता पावसाचा अनुभव देखील गोवेकरांना घ्यावा लागणार आहे.

weather update
IRCTC Goa Tour Package: गोव्याची ट्रीप करा तेही बिनपैशाची! जाणून घ्या सविस्तर...

गोवा राज्यात सध्या थंडी ताप असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यातच वातावरणातील वेगाने होणाऱ्या बदलामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी धुके असल्याचे पाहायला मिळते आहे. तर गोव्यातील ग्रामीण भागात थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या सुरु झाल्याचे चित्रही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com