IRCTC Goa Tour Package: डिसेंबर महिना सुरू होताच न्यू ईयर प्लॅनची चर्चा सुरू होते. त्याच एक प्लॅन गोव्याला जाण्याचाही असतो. अनेकांना गोव्याचे वेध लागतात. पण बऱ्याचदा बजेट पाहून प्लॅनिंग करताना वर्ष संपुन जाते. वेळ कधी निघून गेला कळतच नाही, आणि प्लॅन कॅन्सल झालेला असतो. पण या वर्षी तुम्हाला गोव्यात नवीन वर्ष साजरे करता येणार आहे.
आयआरसीटीसी (IRCTC) ने यासाठी एक पॅकेज जाहीर केले आहे. नवीन वर्ष गोव्यात साजरे करणाऱ्यांसाठी हे पॅकेज असणार आहे. या पॅकेजचे वैशिष्ट्य म्हणजे याचे भाडे तुम्ही हप्त्यांवर देऊ शकता.
IRCTC च्या या गोवा टुर पॅकेजमध्ये विमानाने प्रवास करता येणार आहे. या पॅकेजची सुरवात लखनौमधून होणार आहे. IRCTC च्या इतर पॅकेजेसप्रमाणे यातही राहण्याची आणि खाण्याची सुविधा मोफत दिली जाणार आहे. पर्यटकांना थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा दिली जाईल. तसेच ब्रेकफास्ट आणि लंचही दिला जाईल.
IRCTC च्या या 3 रात्री 4 दिवसाच्या टुर पॅकेजमध्ये तीन लोकांना एकत्र ट्रॅव्हलिंगसाठी प्रत्येकी 28 हजार 040 रुपये द्यावे लागतील. दोन व्यक्ती एकत्र असतील तर त्यांना प्रत्येकी 28 हजार 510 रूपये मोजावे लागतील. तर एकट्याने गोव्याला जाणार असाल तर 34 हजार 380 रुपये द्यावे लागतील.
या पॅकेजमधील सर्वात चांगली बाब म्हणजे, याचे पेमेंट हप्त्यांद्वारे करता येऊ शकले. याची माहिती IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवरही मिळू शकते.
या सुविधांचा समावेश
विमानाचे तिकिट - लखनौ-गोवा-लखनौ
डिपार्चर- 10 डिसेंबर
गोव्यात 3 रात्रींचा स्टे
ब्रेकफास्ट आणि जेवण
शेअरिंग बेसवर 30 सीटर एसी वाहनातून प्रवास
प्रवास विमा
ही ठिकाणे दाखवणार
बेसिलिका ऑफ बोन जीसस चर्च, मिरामार बीच, मांडवी नदीतील क्रुझ, बागा बीच, कँडोलिम बीच, सिन्कवेरिम बीच, स्नो पार्क येथे पर्यटकांना फिरवले जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.