accident
accidentDainik Gomantak

Bicholim: भरधाव बसने पादचाऱ्याला दिली धडक; एक गंभीर जखमी

मुळगाव डिचोली मुख्य मार्गावर घडला अपघात
Published on

गोवा राज्यात गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक समस्येचा मुद्दा चर्चेत असून प्रवासादरम्यान अपघातांचे प्रमाण ही वाढले असल्याची नागरीकांत चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज मुळगाव डिचोली मुख्य मार्गावर एका प्रवासी बसने पादचाऱ्याला जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे.

(One seriously injured in Mulgao to Bicholim main road Karnataka bus accident )

accident
Canacona: धक्कादायक! काणकोण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कोल्हापुरातील एकाच्या मुसक्या आवळल्या

मिळालेल्या माहितीनुसार आज मुळगाव डिचोली मुख्य मार्गावरील पादचाऱ्याला कर्नाटक प्रवासी बसने धडक दिल्याची घटना घडली आहे. हा अपघात मुख्य मार्गावरील तांबडो रस्तो येथे झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

accident
Pm Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौरा पार्श्वभूमीवर मांडवी अन् झुआरी जल वाहतुकीत मोठे बदल

धडक दिल्याने पादचारी वेगाने फरफटत गेल्याची माहिती अपघातावेळी उपस्थितांनी दिली. मात्र अपघात झाल्यानंतर तातडीने जखमी पादचाऱ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जखमी व्यक्तीची अधिकची माहिती मिळू शकलेली नाही. रस्त्याने पायी जाणाऱ्यांचा देखील अपघात होत असल्याने यावर सर्वांनी विचार करण्याची वेळ आली असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com