गोव्यात तीन वाहतूक पोलिस निलंबित

हॉटेल पार्टी भोवली: बिल कमी करण्यासाठी मालकाला शिवीगाळ
Goa police
Goa policeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सांगोल्डा येथील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टीचे जादा बिल लावल्याच्या कारणावरून वाद घालून मालकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी तीन वाहतूक पोलिसांना निलंबित केल्याने पोलिसात खळबळ माजली आहे. या पार्टीमध्ये आठ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. इतरांवरही कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलिस खात्यातील शिस्तबद्धतेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले असून, जनतेचे रक्षकच भक्षक बनू लागल्याने नागरिकांत रोष वाढत आहे.

(Three traffic policemen suspended in Goa)

Goa police
Panchayat Polls: 9, 10 आणि 12 ऑगस्ट रोजी राज्यात दारू विक्रीला बंदी

साळगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंटच्या मालकांनी काल रात्री उशिरा पोलिसांनी त्याला शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचा एक गट काल रात्री या रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी आला होता. त्यामध्ये 8 जणांचा समावेश होता. त्यांनी विविध पदार्थ जेवणासाठी ऑर्डर केले.

त्यानंतर या पार्टीचे बिल त्यांना देण्यात आल्यावर बिल जादा दिल्याप्रकरणी या पोलिसांनी वाद सुरू केला. यावेळी पोलिसांनी मालकाला शिवीगाळ केली व बिलाची रक्कम वाढवून दिल्याने ती न देण्याची धमकी दिली. त्यानंतर हे पोलिस तेथून निघून गेले. झालेल्या घटनेची माहिती मालकाने रात्रीच साळगाव पोलिस स्थानकाला दिली. यासंदर्भातची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचल्याने झालेल्या घटनेची रेस्टॉरंटमध्ये असलेल्या सीसी टीव्ही कॅमेराच्या आधारे प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यामध्ये निलंबित पोलिस रेस्टॉरंट मालकाशी हुज्जत घालत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या निलंबनाचा आदेश वाहतूक पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी बिनतारी संदेशद्वारे काढला.

जनतेचे रक्षक असलेले पोलिसच कायदा मोडून दांडगाई करणाऱ्या पोलिसांची प्रकरणे वारंवार घडत आहेत. काही पोलिस भ्रष्टाचारात गुंतल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिस खात्यांतर्गत चौकशी सुरू आहेत.

Goa police
कला अकादमी गोवातर्फे पं. मनोहरबुवा शिरगावकर भजन स्पधेचे आयोजन

काही वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांची होणाऱ्या सतावणुकीमुळे नेहमीच वादग्रस्त ठरत आहेत. त्यामुळे खात्यातील काही पोलिसांमुळे खात्याची प्रतिमा दिवसेंदिवस डागाळली जात आहे. या चौकशीअंती या पोलिसांना पुन्हा सेवेत घेतले जात आहे. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई केली तरी सेवेतून बडतर्फ होऊ याची भीती पोलिसांना नसल्याने तसेच राजकारण्यांचा वरदहस्त असल्याने ते बिनधास्तपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना न घाबरता वावरताना दिसतात.

पोलिस खाते वादाच्या भोवऱ्यात

पोलिस खाते हे नेहमीच पोलिसांच्या वाईट कृत्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पोलिसांचीही जनतेशी वागण्याची शिस्त कमी होऊन दमदाटी करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांविरुद्ध पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे तक्रारदारांकडून प्रकरणे नोंद होत आहेत. पोलिसांविरुद्ध सुमारे 80 प्रकरणे या प्राधिकरणाकडे दाखल झाली असून त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com