Panchayat Polls: 9, 10 आणि 12 ऑगस्ट रोजी राज्यात दारू विक्रीला बंदी

पंचायत मतदानासाठी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
Panchayat Elections in Goa
Panchayat Elections in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: गोव्यात पंचायत निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्ट आणि एक दिवस अगोदर म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी मद्यविक्रीला बंदी आहे. शिवाय मतमोजणीच्या दिवशी म्हणजे 12 ऑगस्ट रोजी देखील दारू विक्रीवर बंदी आहे.

(Goa Panchayat Polls : Sale & transportation of liquor prohibited on Aug 9, 10 and Aug 12)

Panchayat Elections in Goa
गोव्यात 80 नवीन कोविड प्रकरणे; सक्रिय रूग्णसंख्या 682 वर पोहोचली

गोवा सरकारने आज अधिसूचना जारी केली आहे. संपूर्ण गोवा राज्यात 9 ऑगस्ट, 10 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट रोजी दारू विक्री करणारे सर्व परवानाधारक परिसर बंद राहतील. वर नमूद केलेल्या तारखांना राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दारूची वाहतूक करण्यास मनाई करणारी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

पंचायत मतदानासाठी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

गोव्यात 186 पंचायत निवडणूकीसाठी (Goa Panchayat Election) येत्या 10 ऑगस्टला मतदान होत आहे. मतदानासाठी (Polling) राज्य सरकारने 10 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राज्य सरकारच्या प्रशासन नियोजन विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी द्यावी. गोवा पंचायत राज कायदा 1994 नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यात 186 पंचायत निवडणूकीसाठी सोमवारी अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी दोन्ही जिल्ह्यातून 1,499 उमेदवारी अर्ज दाखल झाले. निवडणूकीसाठी एकूण 6,256 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल अर्जांचे मंगळवारी (दि.26) रोजी छाननी केली जाणार असून, बुधवारी 27 जुलै अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 10 ऑगस्ट रोजी राज्यातील 186 पंचायतीसाठी मतदान (polling) होईल आणि 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी (Vote Counting) होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com