Goa Accident: गोव्यात तीन दुर्घटनांमध्ये तिघांचा बळी! सुकूर, खांडोळ्यात भीषण अपघात; करंझाळेत कोसळलं झाड

Three killed In Goa Accident: राज्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Three killed In Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: राज्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पर्वरीतील आंबेखण-सुकूर येथे दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एक युवक ओढ्यात फेकला जाऊन मृत्युमुखी पडला, खांडोळ्यात बोलेरो जीप व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला तर करंजाळे येथील कामत किनारा परिसरात जुनाट वृक्ष कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

पर्वरीतील आंबेखण-सुकूर येथे बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गणेश विसर्जन स्थळाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात आकाश बिश्वकर्मा (३०, रा. सुकूर, मूळ पश्चिम बंगाल) हा युवक दुचाकीसह रस्त्यालगतच्या खोल ओढ्यात फेकला गेला होता. बुधवारी रात्रीच्या शोध मोहिमेत अग्निशमन दलाला दुचाकी सापडली.

Three killed In Goa Accident
Goa Accident: गोव्यात विकेंडला रक्ताचा सडा! वास्को, नानोडा आणि मंगेशीत भीषण अपघात; 1 ठार, तब्‍बल 18 जखमी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मात्र, अंधार आणि पाण्याच्या प्रवाहामुळे आकाशचा शोध लागला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविली. काही तासांच्या प्रयत्नांनंतर घटनास्थळापासून काही अंतरावर आकाशचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, पणजीतील करंझाळे येथील कामत किनारा परिसरात गुरुवारी सकाळी ११ वा. जुनाट वृक्ष सुरक्षा रक्षकाच्या केबिनवर कोसळला. या दुर्घटनेत केबिनमध्ये बसलेला किम बहादुर (४३, मूळ नेपाळ) याचा जागीच मृत्यू झाला. झाडाचे मोठे खोड कोसळल्याने केबिनचा पूर्णपणे चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी झाड बाजूला करून केबिनमध्ये अडकलेल्या सुरक्षा रक्षकाला बाहेर काढले.

Three killed In Goa Accident
Goa Accident: ऑईल गळतीमुळे भीषण अपघात! बसची पाच वाहनांना धडक, हमरस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सावधगिरीचा इशारा

दुचाकीस्वार जागीच ठार

आमोणे -माशेल हमरस्त्यावर खांडोळा येथे गुरुवारी सकाळी जीए-०६-टी-१६७९ क्रमांकाची बोलेरो जीप आणि एमएच-०७-एव्ही-२३१२ क्रमांकाच्या दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात बांदा (जि. सिंधुदुर्ग) येथील दुचाकीस्वार महादेव सावंत (वय ४३ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच माशेल आऊट पोस्टचे पोलिस हवालदार भावेश कुंभारजुवेकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला. म्हार्दोळ पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com