Air India Flights: अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय; गोवा ते लंडन विमानसेवा एक महिना स्थगित

Mopa To London Air India Flights: याशिवाय दिल्ली ते नैरौबी, अणृतसर ते लंडन ही विमान उड्डाणे देखील १५ जुलै पर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.
Mopa To London Air India Flights
Air India FlightDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अहमदाबाद येथे एअर इडियाच्या विमानाचा अपघात घेऊन २४१ प्रवासी आणि काही नागरिकांचा मृत्यू झाला. भारताच्या इतिहासातील हा एक सर्वात मोठा अपघात मानला जातो. या अपघातानंतर विमानाची सुरक्षा, आणि विमानांची देखभाल याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. अशात एअर इंडियाच्या वतीने मोठा निर्णय घेतला असून, एक महिन्यासाठी विविध फ्लाईट्स तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

फ्लाईट्ची सुरक्षा तपसणी करण्याच्या दृष्टीने एअर इंडियाने बाईंग ७८७ आणि ७७७ विमानाची उड्डाणे काही काळासाठी रद्द करण्यात आली आहेत. तसेच, मध्य पूर्व भागात एअरस्पेस बंद करण्यात आल्याने देखील काही उड्डाण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. २१ जून ते १५ जुलै दरम्यान हा बदल कायम राहणार आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

एअर इंडियाने गोवा ते लंडन (गॅटविक) विमान उड्डाण १५ जुलैपर्यंत तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातून लंडनसाठी आठवड्यातून तीनवेळा फ्लाईट्स उड्डाण घेतात.

Mopa To London Air India Flights
इनडोको फार्माचा पुन्हा खोडसाळपणा; गोव्यातील नोकरीसाठी महाराष्ट्र, गुजरातमध्ये आयोजित केल्या मुलाखती

याशिवाय दिल्ली ते नैरौबी, अणृतसर ते लंडन ही विमान उड्डाणे देखील १५ जुलै पर्यंत स्थगित करण्यात आली आहेत.

दिल्लीतून टोरोंटो, वँक्युव्हर, सन फ्रँन्सिसको, शिकागो आणि वॉशिंगटनसाठी उड्डाण घेणाऱ्या फ्लाईची संख्या आठवड्याला ३, ५ ते ७ अशी कमी करण्यात आली आहे. तसेच, इतर अनेक फ्लाईट्सची संख्या कमी करण्यात आली आहे. याची सविस्तर माहिती सोबत जोडलेल्या एअर इंडियाच्या पत्रकात वाचता येईल.

Mopa To London Air India Flights
Pernem: पंचायती 21, तलाठी आठच! पेडणे तालुक्याची व्यथा; ग्रामस्थांची होतेय गैरसोय

नियोजित बदलामुळे प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोईबाबत एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, आवश्यक फ्लाईटमध्ये बदल आणि रिफंडची सोय करण्यात येईल, असेही कंपनीने म्हटले आहे. नियोजित सुरक्षा तपासणी आणि देखभाल पूर्ण झाल्यानंतर अद्यावत वेळापत्रक एअर इंडियाच्या संकेतस्थाळवर देण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com