Govind Gawade
Govind GawadeDainik Gomantak

37th National Games: सेलिंगमध्ये गोमंतकीयांचे भवितव्य उज्ज्वल- गोविंद गावडे

दोना पावला येथील यॉटिंग सुविधांची केली पाहणी
Published on

गोव्यात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यॉटिंगमधील शर्यती दोना पावला येथील समुद्रात होतील.

त्या अनुषंगाने क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी या स्पर्धा केंद्राला शनिवारी भेट दिली, सुविधांची पाहणी केली आणि नंतर सेलिंगमध्ये गोमंतकीयांना उज्ज्वल भवितव्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.

क्रीडामंत्री गावडे यांच्यासमवेत गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक गीता नागवेकर, गोवा यॉटिंग असोसिएशनचे अध्यक्ष रेनर डायस व अन्य पदाधिकारी होते. दोना पावला येथे सध्या सेल गोवा स्पर्धा सुरू आहे.

Govind Gawade
Goa Corona Update: गोव्यात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या 539 वर; नवीन 'इतक्या' रूग्णांची भर

या स्पर्धेतील शनिवारच्या शर्यतीला क्रीडामंत्री गावडे यांनी सुरवातही केली. त्यांनी गोमंतकीय सेलर्सची भेट घेऊन त्यांच्याबद्दलची माहिती घेतली.

सेलिंगमधील शर्यती, त्यासाठी लागणाऱ्या सुविधा व इतर बाबींचीही त्यांनी चौकशी केली. सेलिंग स्पर्धेचे सुरेख आयोजन करणाऱ्या गोवा यॉटिंग असोसिएशनलाही त्यांनी शाबासकी दिली.

Govind Gawade
Goa Fire: जुनसावाडा-मांद्रे टेकडीवर भीषण आग, आगीचे कारण अस्पष्ट

डेन, कात्याची आघाडी कायम

गोव्याचा आघाडीची सेलर डेन कुएल्हो याने पुरुषांच्या आयक्यू फॉईल प्रकारात आघाडी कायम राखली. शनिवारी दिवसभरातील चारपैकी दोन शर्यतीत डेन अव्वल ठरला. अन्य दोन शर्यती आर्मी यॉटिंग नोडच्या जेरोम कुमारने जिंकल्या.

महिलांच्या आयक्यू फॉईल प्रकारात गोव्याची कात्या कुएल्हो हिने विजयी लौकिक जपताना दिवसभरातील चारही शर्यती जिंकून विजेतेपद निश्चित केले. आरएसःएक्स गटात इबाद अली याने चारही शर्यतीत बाजी मारून आघाडी भक्कम केली.

पुरुषांच्या रेसबोर्ड प्रकारात चेन्नय्या याने चारही शर्यतीत अव्वल कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले. आरएसःवन गटात गणेश विश्वकर्मा तीन शर्यतीत विजयी ठरला, त्यामुळे त्याची आघाडीही वाढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com