Panaji Goa: गोलमाल है भाई सब गोलमाल है! स्मार्ट पणजीत सापडले आणखी एक गांजाचे झाड, पाहा video

Tonk Panjim News: गेल्या आठ दिवसांमध्ये तिसऱ्यावेळा पणजी शहरात गांजाचे रोप आढळून आले आहे
Panaji Goa
Panaji GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी स्मार्ट शहरात नेमकं काय चाललंय असा प्रश्न निर्माण झालाय. गेल्या आठ दिवसांमध्ये तिसऱ्यावेळा पणजी शहरात गांजाचे रोप आढळून आले आहे. शनिवारी (११ जानेवारी) टोंक पणजी येथील एका रेस्टॉरंटजवळ आढळून आल्याने खळबळ माजली आहे. अजूनही गांजाची रोपटी नेमकी कुठून येतायत हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सर्वात आधी म्हणजेच ४ जानेवारी रोजी काकुलो मॉलजवळ गांजाचं रोप सापडलं होतं. एखाद्याने काळजी घेऊन उगवल्याप्रमाणे ते रोप सापडल्याने सर्वांना प्रश्न पडला होता. यानंतर दोन दिवसांनंतर ६ जानेवारीच्या दिवशी सकाळी संतीनेज परिसरात शीतल हॉटेल ते मधुबन जंक्शन रस्त्यावर असलेल्या झरीना टॉवरजवळ आणखीन एक रोप सापडलं. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या रोपांचं परीक्षण करून ती रोपं गंजचीच असल्याची पुष्टी केली होती.

"हावेन ही झाडा रोयल्यात?"

काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी पणजीचे आमदार बाबूश यांना पणजीत सलग दोनवेळा घडलेल्या या विचित्र प्रकाराबद्दल प्रश्न केला होता आणि असा प्रश्न विचारल्यानांतर बाबूश म्हणाले की , "मी ती झाडं लावली आहेत का?, ती झाडं कोणी लावली हे शोधून काढा.मीच अशा प्रकारांना प्रोत्साहन देत असल्याप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारात आहात." पणजीचे आमदार असून देखील बाबूश मोन्सेरात यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते सध्या बऱ्याच चर्चेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com