
पणजी: काकुलो मॉल, पणजीच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली. स्मार्ट सिटीमध्ये रस्त्याच्या कडेला अचानक एक गांजाचं रोप सापडल्याने सगळीकडेच खळबळ उठली आहे. परिसरात हे रोप नेमकं आलं तरी कुठून यावर विविध चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे हे रोप व्यवस्थित लक्ष देऊन उगवल्यासारखं वाढलं असल्याने कुणीतरी उगाच हे आणून टाकलंय की आपोआप उगवलं आहे हे समजत नाहीये.
व्यस्त रस्त्याच्या कडेला गांजाचे रोप आढळून आले. हे रोप व्यवस्थित वाढवलेलं आहे आणि व्यवस्थित कापून तयार केलंय. या रोपाला आजूबाजूनी फुलांनी वेढलंय. काही लोकं हे रोप पाहून भरपूर थक्क झालेत तर इतरांना याचं नेमकं कारण स्पष्ट होत नसल्याने चिंता सतावतेय.
"मी कामावर जात असताना मला हे रोप दिसलं. सुरुवातीला मला वाटलं की हे फक्त एक विचित्र दिसणारं रोप आहे, पण नंतर मला उमगलं की ते एक गांजाचं रोप आहे मात्र मला यावर विश्वासच बसत नव्हता!" एका स्थानिकाने मत व्यक्त केलंय.
हा विचित्र प्रकार घडताच शहराच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अधिकारी हे रोप स्मार्ट सिटीच्या आवारात कसे आले हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे रोप मुळापासून उपटून परीक्षणासाठी पाठवण्यात आलंय, त्यापूर्वी या रोपाचं वजन करून आणि आवश्यक तपासणी करून हे झाड गांजाचंच असल्याची खात्री करण्यात आली आहे. गोव्याच्या राजधानीत अचानक हा प्रकार घडला असल्याने अनेकांना प्रश्न पडलाय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.