NIA Raid on PFI: गोव्यासह युपी, बिहार, पंजाब येथे 'एनआयए'चे छापे; 'पीएफआय' विरोधातील सर्वात मोठी कारवाई

बिहारमधील 12, उत्तर प्रदेशातील 2, पंजाब आणि गोव्यातील प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश
NIA Raid on PFI
NIA Raid on PFIDainik Gomantak

NIA Raid on PFI: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरोधात देशभरात छापे टाकले आहेत.

एजन्सीने मंगळवारी सकाळी गोव्यासह उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब या राज्यांचा समावेश आहे.

या संघटनेच्या बंदी घातलेल्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. एनआयएनची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई म्हणून या तपासाकडे पाहिले जात आहे. गोव्यातील फोंडा येथे छापे टाकल्याची माहिती आहे.

NIA Raid on PFI
'म्हादई'बाबत अमित शाहांचे फर्मागुडीत मौन, हुबळीतील सभेत मात्र मोठे वक्तव्य...

राष्ट्रीय तपास यंत्रणा ज्या ठिकाणांचा शोध घेत आहे त्यामध्ये बिहारमधील 12, उत्तर प्रदेशातील 2 आणि पंजाब आणि गोव्यातील प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे. बिहारच्या धरभंगा येथील उर्दू मार्केटमध्येही छापे टाकले आहेत.

NIA आणि ED द्वारे गेल्या वर्षी संपूर्ण देशभरात छापे टाकले होते. त्यानंतर केंद्राने PFI वर बेकायदा कृत्यांसाठी UAPA कायद्यानुसार बंदी घातली होती.

दहशतवादाला मदत, वित्तपुरवठा, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारवाया या संघटनेकडून होत होत्या, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले होते.

NIA Raid on PFI
Canacona Accident: व्होल्वो बसची दुचाकीला जोरदार धडक; चापोलीतील पती-पत्नीचा दुर्दैवी अंत...

केंद्रीय गृहमंत्रालयाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेसह तिच्याशी संलग्न इतर संघटनांवरही बेकायदा कारवयांत गुंतल्यावरून UAPA कायद्यानुसार बंदी घातली आहे.

यात रिहॅब इंडिया फाऊंडेशन (RIF), कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (CFI), ऑल इंडिया इमाम्स कौन्सिल (AIIC), नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन (NCHRO), नॅशनल वुमेन्स फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन आणि रिहॅब फाऊंडेशन केरळ या संघटनांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com