CM Pramod Sawant: राज्य मंत्रिमंडळात आणखी फेरबदल होणार नाही; डॉ. प्रमोद सावंत

CM Pramod Sawant: राज्य मंत्रिमंडळात आणखी फेरबदल होणार नाही. राज्य व केंद्रीय पातळीवर तशी कोणतीही चर्चा नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
Shripad Naik | Dr. Pramod Sawant
Shripad Naik | Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: राज्य मंत्रिमंडळात आणखी फेरबदल होणार नाही. राज्य व केंद्रीय पातळीवर तशी कोणतीही चर्चा नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दोन आमदारांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेणार असल्याची चर्चा राज्यभरात विविध माध्यमांतून सुरू आहे.

Shripad Naik | Dr. Pramod Sawant
Goa Accident Death: राज्यात 2700 अपघातांत वर्षभरात 259 जणांचा मृत्यू

त्याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील यशानंतर भाजपची स्थिती सर्वत्र भक्कम झाली आहे.

राष्ट्रीय पातळीवर 400 हून अधिक जागा लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकणार आहे. मंत्रिमंडळातील याआधीचा फेरबदल हा केंद्रीय नेत्यांच्या सूचनेवरून झाला असला तरी पक्षप्रवेशावेळी देण्यात आलेल्या आश्वासनामुळे तसे करावे लागले होते.

Shripad Naik | Dr. Pramod Sawant
Goa Casino: जाणून घ्या, पर्यटकांना का आकर्षित करते गोव्यातील कॅसिनो?

तानावडे यांनी नड्डा यांची भेट घेऊन मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील निवडणुकांमध्ये पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान नड्डा यांचे नेतृत्व व प्रचारकार्यातील त्यांचा महत्त्वाचा सहभाग या दोन्ही घटकांनी भाजपाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलल्याचे मत तानावडे यांनी व्यक्त केले.

तेलंगणामधील भाजपच्या मतांची टक्केवारी वाढल्यानिमित्त देखील तानावडे यांनी नड्डा यांचे अभिनंदन केले. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने तानावडे यांनी गोवा भाजपाची सद्यःस्थिती व संघटनात्मक पैलूंबद्दल नड्डा यांच्याशी चर्चा केली.

यावेळी पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच पक्षाची तळागाळातील पोहोच वाढविण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलावीत याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com