G-20: ‘स्टार्टअप’साठी सामूहिक सामर्थ्य दाखवा

डॉ. वैष्णव यांचे आवाहन: ‘जी - 20’च्या बैठकीला आश्वासक सुरवात
G-20
G-20Dainik Gomantak
Published on
Updated on

G-20  देशांनी एकत्र येऊन  आपल्या सामुहिक सामर्थ्याची सांगड घालत   धोरण चर्चेत आकाराला आलेला दृष्टीकोन साकारण्यासाठी एकत्र येऊन काम करावे, स्टार्टअपची भरभराट,  नवोन्मेष आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर दीर्घ काळ टिकणारा प्रभाव पाडावा.

यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे, असे आवाहन डॉ. चिंतन वैष्णव यांनी केले. ‘जी-20’  अंतर्गत ‘स्टार्टअप - 20’  प्रतिबद्धता गटाची  तिसरी बैठक आजपासून पणजीजवळच्या हॉटेलमध्ये सुरू झाली.

‘जी - 20’ सदस्य देश आणि निमंत्रित देशातील 250 हून अधिक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत. सकाळच्या सत्राची सुरवात ‘स्टार्टअप -  20’ चे अध्यक्ष डॉ. चिंतन वैष्णव यांनी केलेल्या स्वागतपर भाषणाने झाली.

‘जी - 20’  सदस्य देशांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना डॉ. चिंतन म्हणाले,  “जागतिक स्टार्टअप परिसंस्थेच्या भविष्याला आकार  देण्याच्या आपल्या अभियानासाठी आपण एकत्र आलो आहोत,  याबद्दल मला अत्यंत अभिमान आणि कृतज्ञता वाटत आहे.

आज सादर करण्यात आलेले  धोरण परिपत्रक आपल्या सामूहिक प्रयत्नांचा आणि गहन चर्चात्मक प्रक्रियेप्रती असलेल्या  आपल्या वचनबद्धतेचा दाखला आहे. आपण एकत्र आल्यानंतर आपल्याकडे  अडथळे दूर करण्याचे, समावेशकता जोपासण्याचे आणि जबाबदार नवोन्मेषाला चालना देण्याचे सामर्थ्य आहे.

भावी  पिढ्यांना प्रेरणा देणारा परिवर्तनशील प्रभाव निर्माण करण्यासाठी आपण या संधीचा लाभ घेऊया. आपली आजची कृती जगभरातील स्टार्टअपचे भविष्य घडवेल.

दुपारच्या सत्रात प्रभावी नेतृत्व करणाऱ्या वक्त्यांच्या भाषणांची मालिका अनुभवता आली. संध्याकाळच्या सत्रात, ‘अडथळे दूर करत  स्टार्टअप कशाप्रकारे एक समावेशक आणि जबाबदार इंटरनेट परिसंस्था तयार करत आहेत’  यावर उद्योग तज्ञांच्या एका प्रतिष्ठित वैशिष्ट्यीकृत मंडळाने चर्चा केली.

यानंतर प्रख्यात वक्त्यांनी स्टार्टअप -20  मालिकेअंतर्गत प्रेरणादायी चर्चा केली. यामध्ये अटल इनोवेशन मिशनचे माजी संचालक  रामानन रामनाथन, अमरा एक्सपोर्ट्स-संस्थापक/संचालक आयशा सनोबर, वाकाओ फूड्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साईराज धोंड,  प्रोजेक्ट नवेलीचे संस्थापक नव्या नवेली नंदा आणि एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा यांनी सहभाग नोंदवला.

G-20
Tourists Robbery in Goa: कळंगुट बीचवर मसाज करण्याच्या बहाण्याने पर्यटकांची लुबाडणूक; 34 दलालांवर गुन्हा

पहिल्या दिवशी सुमारे 250 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी ‘स्टार्टअप - 20  गोवा संकल्पना’मध्ये सहभाग घेतला आणि देशभरातील सुमारे 40 हून अधिक स्टार्टअपनी त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन केले.

1 अब्ज डॉलर गुंतवणुकीची गरज

धोरण परिपत्रकाला  आकार देणाऱ्या  विविध कृती दलाद्वारे केलेल्या शिफारशींच्या सादरीकरणाकडे या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले. फाउंडेशन टास्क फोर्सचे नेतृत्व करणाऱ्या  प्रोफेसर श्रीवर्धिनी झा यांनी स्टार्टअप डेफिनेशन फ्रेमवर्क सामायिक केले.

त्यानंतर  शिवकिरण एम. एस यांनी अलायन्स टास्क फोर्सच्या शिफारशी सादर केल्या आणि केंद्राचे जागतिक नेटवर्क तयार करण्यासाठी टेम्पलेट शेअर केले. त्यानंतर  राजन आनंदन यांनी वित्त कृती दलाच्या शिफारशींचे अनावरण केले.

आणि 2024  पर्यंत स्टार्टअपमध्ये  1  ट्रिलियन डॉलर  गुंतवणुकीचे आवाहन केले. हरजिंदर कौर तलवार यांनी समावेशन कृती दलाच्या शिफारशी सादर केल्या.  विनीत राय यांनी स्टार्टअपमध्ये हेतुपुरस्सर आणि प्रभावासाठी एक फ्रेमवर्क तयार केले जाऊ शकते ही संकल्पना मांडली.

G-20
हिम्मतवाल्या आईची कहाणी : अनेक संकटं पेलवत 'त्यांनी' दिला दुर्धर रोगाविरुद्ध लढा

योगदानाचे आवाहन-

डॉ. वैष्णव यांनी ‘जी - 20’  देशांनी त्यांचे कौशल्य,  दृष्टीकोन आणि शिफारशींचे सक्रियपणे योगदान द्यावे,  असे आवाहन केले. ज्यामुळे या परिपत्रकाला अंतिम स्वरूप द्यायला मदत होईल.  

ज्यायोगे जगभरातील स्टार्टअपचा विकास आणि यशाला चालना देणारी एक मजबूत चौकट निर्माण होईल. जगभरातील स्टार्टअप परिसंस्थेसाठी प्रमाण ठरतील अशा धोरणांना आकार देण्यासाठी सामुहिक ज्ञान आणि सामायिक दायित्व महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com