Tourists Robbery in Goa: कळंगुट बीचवर मसाज करण्याच्या बहाण्याने पर्यटकांची लुबाडणूक; 34 दलालांवर गुन्हा

ही कारवाई पर्यटन व्यापार अधिनियम 1982च्या कलमांतर्गत करण्यात आली.
Tourists Robbery in Goa
Tourists Robbery in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Tourists Robbery in Goa: राज्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांबाबत अनेकदा गैरप्रकार घडण्याच्या घटना याआधी आपण ऐकल्या आहेत. अशीच एक घटना कळंगुटमध्ये घडली आहे. मसाज करण्याच्या बहाण्याने हरियाणातील पर्यटकाची लुबाडणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याची घटना घडली आहे. याबाबत लुबाडणूक करणाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यांनी याबाबत कारवाईचा बडगा उचलला आहे.

Tourists Robbery in Goa
Mumbai Goa Vande Bharat Train : ‘वंदे भारत’ ट्रेन मुंबई-गोवा मार्गावर उद्यापासून धावणार

कळंगुट किनाऱ्यांवर आलेल्या पर्यटकांना विविध आमिषे दाखवून त्यांना कथित लुटणाऱ्या ३४ दलालांविरूद्ध कळंगुट पोलिसांनी गुन्हा नोंदविला. कळंगुट व बागा किनारी परिसरात ही कारवाई पर्यटन व्यापार अधिनियम 1982च्या कलमांतर्गत करण्यात आली.

पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांना विविध आमिषे दाखवून त्यांना लुटण्याचे प्रकार चालू आहेत. याविषयी पंचायत, पंच सदस्य व स्थानिकांकडून आम्हांला तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून या दलालांची धरपकड आम्ही सुरू केली आहे. याअंतर्गत शुक्रवारी सायंकाळी उशिरा ३४ जणांना आम्ही ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंदविला. ही मोहीम यापुढे चालूच राहणार आहे.

'हे' संशयित पोलिसांच्या ताब्यात....

कळंगुट पोलिसांनी गणेश लमाणी, व्यंकटेश पुजार, बबलू यादव, कृष्णा पुजार, दिलबर खान, अविनाश पासवान, पकंज सोनवणे, संजीव शर्मा, संजय राठोड, हेमंत कुमार, राज सिंग, झकीर समसुद्दिन, पवन सिंग, राजू विवेक, रामकृष्ण बेहरा, किरण सावंत, राजेश बंजारा, ज्ञानेश्वर अटोले, तारीक हुसैन, मोहम्मद इमरान कुरैशी, नंदकिशोर सिंग, अमित मोहन, विशाल रावत, प्रसाद चटला, महासिन सरकार, रियाझुद्दीन अहमद, संतोषा राठोड, आर्यन सय्यद, सायबाग हुसैन, मोहम्मद जफर, विशाल सोनाले, दुर्गेश मृत्यूंजय, साहुकार श्रीहरिष या संशयितांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com