हिम्मतवाल्या आईची कहाणी : अनेक संकटं पेलवत 'त्यांनी' दिला दुर्धर रोगाविरुद्ध लढा

‘ती’ने सकारात्मक ऊर्जेने केली कॅन्सरवर मात
Disease
DiseaseDainik Gomantak
Published on
Updated on

बँकेतली सुखासीन नोकरी, बिझनेसमन नवरा आणि दहा-अकरा वर्षांचे मूल अशा ‘असावे आपुले घरकुल छान’ संकल्पनेप्रमाणे स्वच्छंदी जीवन जगताना अचानक उमटलेली छातीतील कळ एका जीवघेण्या संकटाला जन्म देऊन गेली. काही काळ भयाने घेरले होते.

पण डॉक्टर, पती आणि मुलाने दिलेली खंबीर साथ सकारात्मक ऊर्जेत बदलत गेली आणि कॅन्सरसारख्या भयंकर रोगाविरोधात चार हात करण्याचे हत्तीचे बळ मिळाले. ही सत्यघटना आहे कॅन्सरच्या गंभीर आजारातून पुन्हा सामान्य जीवन जगण्याची हिंमत दाखवणाऱ्या पूनमची.

Disease
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या ताज्या किमती

कर्करोगमुक्त रुग्ण दिनानिमित्त मणिपाल हॉस्पिटलमधील ज्येष्ठ कॅन्सरतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेऊन पूर्णतः बऱ्या झालेल्या नीलिमा आपला अनुभव सांगत होत्या.

त्या म्हणाल्या, वयाच्या ४२ व्या वर्षी सारे काही ठीकठाक असताना अचानक छातीत दुखू लागले. सुरुवातीला इतर काही तरी असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, कळ वाढतच गेल्याने डॉक्टरांकडे जायचे ठरवले.

Disease
Mumbai Goa Vande Bharat Train : ‘वंदे भारत’ ट्रेन मुंबई-गोवा मार्गावर उद्यापासून धावणार

त्यासाठी मी मुंबई गाठली. तिथे कॅन्सरचे निदान झाले आणि आभाळ कोसळल्याचा भास झाला. नऊ-दहा वर्षांचा मुलगा, नातेवाईकांचा गोतावळा यांमुळे अस्वस्थता वाढली. आई-वडिलांना मी एकटीच.

आईचे निधन झाल्याने कोसळलेला डोंगर सावरतानाच हे नवे संकट आल्याने मी पुरती कोलमडले. पण उपचाराशिवाय पर्याय नसल्याने हॉस्पिटलात भरती व्हावे लागले.

अनेक चाचण्यांनंतर कॅन्सरने तिसरा टप्पा गाठल्याचे लक्षात आल्याने अस्वस्थता अधिकच वाढली. अशा स्थितीत मला योग, प्राणायामने साथ दिली. आत्मबल वाढण्यास मदत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com