Ministry of Skill Development: तरुणांनो, प्रशिक्षणार्थी योजनेचा लाभ घ्‍या!- सावंत

15 जुलैपर्यंत 10 हजार जणांच्‍या हातांना काम; नोंदणीचे आवाहन
Skill Development
Skill Development Dainik Gomantak
Published on
Updated on

Ministry of Skill Development नोकरदार आणि बेरोजगार युवकांमधील दरी कमी करण्यासाठी राज्‍य सरकारने ‘ॲप्रेन्‍टीसशीप’ (प्रशिक्षणार्थी) योजना तयार केली असून, १५ जुलै अर्थात जागतिक युवा कौशल्य दिनापर्यंत १० हजार तरुणांच्‍या हातांना काम देण्‍याचा मानस आहे, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी आज केले.

उद्योगांना बळकटी मिळावी तसेच स्‍थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी राज्‍य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्‍या अनुषंगाने राज्य औद्योगिक संघटना सदस्‍य व मुख्‍यमंत्री यांच्‍यात शुक्रवारी संवाद झाला.

अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी विविध विषयांवर विस्‍ताराने चर्चा करून काही मागण्‍यांकडे लक्ष वेधले.

Skill Development
Konkani Language Board: कुणीही यावे, कोकणीचे प्रमाणपत्र घेऊन जावे!

राज्य सरकारचे खास पोर्टल

  • उमेदवार व कंपन्‍यांनी संधींसदर्भात apprenticeshipindia.gov.in वर नोंदणी करावी.

  • इयत्ता पाचवी पास ते आयटीआय, डिप्लोमा, पदवीधारक उमेदवार नोंदणी करू शकतात.

  • केंद्र व राज्‍य सरकारकडून प्रत्‍येकी १५०० रुपये व त्‍यात भर टाकून किमान वेतन मिळणार.

  • कंपन्‍यांना एकूण कर्मचाऱ्यांच्‍या संख्‍येपैकी किमान २.५ टक्‍के प्रशिक्षणार्थी भरणे अनिवार्य.

  • १ ते ३ वर्षांसाठी प्रशिक्षण. त्‍यानंतर कौशल्य विकास मंत्रालयाकडून मिळणार प्रमाणपत्र.

Skill Development
Calangute News: प्रतिकूलतेवर मात करत विल्बर्ट बनला ‘आयर्नमॅन’

यंत्रणा सज्ज :

सरकार ५ हजार तरुणांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेईल; तर १५ जुलैपर्यंत उर्वरित ५ हजार तरुणांना सामावून घेण्यासाठी औद्योगिक कंपन्‍या व घटनांनी सहकार्य करावे! दोन आठवड्यांत पोर्टलवर किमान १५ हजार इच्छुकांची नोंदणी करण्यासाठी सरकारी यंत्रणा कामी लावण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com