Calangute News: प्रतिकूलतेवर मात करत विल्बर्ट बनला ‘आयर्नमॅन’

जिगरबाज : फिलिपिन्समध्ये जोरदार पाऊस, खवळलेल्या समुद्रातही केली लक्ष्यपूर्ती
Wilbert Egyptian
Wilbert EgyptianDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute News प्रतिकूल हवामानाची तमा न बाळगता कळंगुट येथील ४२ वर्षीय विल्बर्ट इजिप्सी याने फिलिपिन्समधील खडतर आयर्नमॅन शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली. स्युबिक बे येथे झालेल्या स्पर्धेत त्याने खुल्या समुद्रातील जलतरण, सायकलिंग व पूर्ण मॅरेथॉन मिळून एकूण २२६ किलोमीटर अंतर १५ तास ४४ मिनिटांत पूर्ण केले. ही शर्यत १७ तासांत पूर्ण करणे आवश्यक होते.

विल्बर्ट मूळचा वेळसांव येथील; पण सध्या कळंगुटला राहतो. तंत्रज्ञानविषयक सल्लागार आहे. त्याच्यासाठी फिलिपिन्समधील शर्यत कसोटी पाहणारी ठरली. पावसाचा तडाखा सोसत त्याने गेल्या रविवारी (ता. ११) लक्ष्यपूर्ती साधली.

Wilbert Egyptian
Assembly session: मनोधैर्य नसल्यानेच 18 दिवस अधिवेशन- विरोधकांचा हल्लाबोल

फिलिपिन्समधील शर्यतीविषयी विल्बर्टने सांगितले की, ‘पूर्ण शर्यतीच्या कालावधीत जोरदार पाऊस अन् समुद्रही खवळलेला होता आणि मलब्यामुळे जलतरण कठीण ठरले. दहा ट्रायथलीट्सना शर्यत प्रारंभीच सोडावी लागली.’

Wilbert Egyptian
Konkani Language Board: कुणीही यावे, कोकणीचे प्रमाणपत्र घेऊन जावे!

ट्रायथलीट विल्बर्टचा आतापर्यंतचा अनुभव

1. कोलंबो आणि गोव्यात ७०.३ आयर्नमॅन शर्यत यशस्वीपणे पूर्ण.

2. नऊ पूर्ण मॅरेथॉन, २ अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सफलता.

3. २०० किलोमीटर सायकलिंग, ५ किलोमीटर समुद्री जलतरण शर्यतीत बाजी.

शरीर थकले; पण... :

‘अर्धमॅरेथॉन माझ्यासाठी खूपच कठीण ठरली. धावताना पहिल्या चार किलोमीटरनंतर पोटरीचे स्नायू दुखू लागले. पुढे १० किलोमीटरनंतर गुडघा त्रास करू लागला; पण अर्ध्यावर थांबलो नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शर्यत पूर्ण केलीच.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com