Konkani Language Board: कुणीही यावे, कोकणीचे प्रमाणपत्र घेऊन जावे!

‘मला कोकणी लिहायला, वाचायला कळते’ एवढेच लिहून दिल्‍यावर मिळते प्रमाणपत्र
Konkani Language
Konkani LanguageDainik Gomantak
Published on
Updated on

Konkani Language राज्‍यात सरकारी नोकरीसाठी कोकणी भाषेचे ज्ञान सक्तीचे असले, तरी अशी अट परराज्‍यांतील उमेदवार सहजगत्‍या पूर्ण करत आहेत.

‘कोकणी भाषा स्वतःला समजते’ याचे प्रमाणपत्र मिळविणे एवढे सोपे झाले आहे की, मला कोकणी लिहायला आणि वाचायला कळते, इतके लिहून दिले तरी पुरे! राज्यातील प्रमुख कोकणी संस्था, अर्थात ‘कोकणी भाषा मंडळ’च असे प्रमाणपत्र देते.

पणजीत नुकत्‍याच झालेल्‍या रोजगार मेळाव्‍यात 126 उमेदवारांना केंद्र सरकारच्‍या नोकऱ्यांचे नियुक्‍तीपत्र मंत्री श्रीपाद नाईक यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आले.

परंतु त्‍यात केवळ दोघेच गोमंतकीय होते. ‘गोमन्‍तक’ने या विषयाची पोलखोल करताच सामाजिक पटलावर साधक-बाधक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Konkani Language
Goa Accident: दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले, संतप्त जमावाने पेटवल्या दोन क्रेन, वातावरण तंग

मागील वर्षी न्यायालय आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची नोकरभरती प्रक्रिया झाली, तेव्‍हा सुमारे 3 हजार उमेदवारांनी कोकणी भाषा मंडळाकडून अशी प्रमाणपत्रे नेल्‍याचे समोर आले आहे. भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ यांनी या माहितीला दुजोरा दिला.

मात्र, हे बहुतेक उमेदवार कारकून आणि त्या खालच्या पदांसाठी अर्ज केलेले होते, असे त्यांनी सांगितले. कोकणी अकादमीचे अन्य एक माजी अध्यक्ष दिलीप बोरकर यांनीही या राज्‍यात सरकारी नोकरीसाठी कोकणी भाषेचे ज्ञान सक्तीचे असले, तरी अशी अट परराज्‍यांतील उमेदवार सहजगत्‍या पूर्ण करत आहेत.

‘कोकणी भाषा स्वतःला समजते’ याचे प्रमाणपत्र मिळविणे एवढे सोपे झाले आहे की, मला कोकणी लिहायला आणि वाचायला कळते, इतके लिहून दिले तरी पुरे! राज्यातील प्रमुख कोकणी संस्था, अर्थात ‘कोकणी भाषा मंडळ’च असे प्रमाणपत्र देते.

Konkani Language
Assembly session: मनोधैर्य नसल्यानेच 18 दिवस अधिवेशन- विरोधकांचा हल्लाबोल

भाषा मंडळाच्या अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ यांनी या माहितीला दुजोरा दिला. मात्र, हे बहुतेक उमेदवार कारकून आणि त्या खालच्या पदांसाठी अर्ज केलेले होते, असे त्यांनी सांगितले. कोकणी अकादमीचे अन्य एक माजी अध्यक्ष दिलीप बोरकर यांनीही या पद्धतीवर टीका करताना, ही केवळ ''भोगावळ'' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

कोकणी चळवळीत पोटतिडकीने काम करणारे कार्यकर्ते दामोदर घाणेकर यांनी गोव्याच्या युवकांचे हित रक्षणासाठी कोकणीची परीक्षा अधिक समर्पक रितीने घेण्याची गरज व्यक्त केली. मला कोकणी लिहायला- वाचायला कळते, हे वाक्य ज्याला कोकणी कळत नाही तोही लिहू शकतो. अशा थातूर-मातूर परीक्षेतून काहीच सिद्ध होऊ शकणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मी कोकणी अकादमीचा अध्यक्ष असताना असे प्रमाणपत्र अकादमी देत असे. त्यावेळी आम्ही उमेदवारांची रितसर लेखी परीक्षा घेत होतो. त्यातून त्या उमेदवाराला खरेच कोकणी कळते की नाही, हे सिद्ध व्हायचे - एन. शिवदास, कोकणी साहित्यिक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com