Goa Culture: गोव्यात जपली जाते विश्‍वबंधुत्वाची भावना

Goa Culture: विविध सण साजरे : परप्रांतीय उत्सव आयोजनातही राज्य अग्रणी
Goa Culture
Goa CultureDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Culture: गोवा हे पर्यटन राज्य आहे. त्यामुळे जगभरातील नागरिक राज्याला भेट देत असतात. तसेच कामाच्या निमित्ताने देखील देशभरातील राज्यातील लाखो नागरिक गोव्यात वास्तव्याला आहेत. त्यामुळे काहींना आपल्या प्रमुख सणांवेळी आपल्या राज्यात जाऊन ते सण साजरे करणे शक्य नसते.

Goa Culture
Goa Electricity: वीज क्षेत्रात राज्याला स्वयंपूर्ण बनवू

अशावेळी हे नागरिक आपापल्यापरीने एकत्र येऊन आपले सण उत्सव साजरे करतात. गोमंतकीय नागरिकही त्यात आवर्जुन सहभाग घेत असतात. गोवा राज्य आपली पारंपरिक संस्कृती टिकवत इतरांना देखील आपापल्या उत्सवात सहभागी करून घेत आहे. राज्यात अनेक समाज राज्यात गुण्यागोविंदाने राहत असून विश्‍वबंधुत्वाची भावना जपणारे राज्य म्हणून गोव्याकडे पाहले जात आहे. गोव्यात केरळ, कर्नाटक, महाराष्‍ट्र, बंगाल, तामिळनाडू, बंगाली, नेपाळी, गुजराती, पंजाबी, आसामी तसेच इतर राज्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.

Goa Culture
Bicholim Fire station: डिचोलीत ‘फायर स्टेशन’ला चालना

केरळवासीयांचा ओणम, आसामी समाजाची जग्गनाथ यात्रा, कर्नाटक राज्यातील नागरिकांचा दसरा, तामिळनाडूचा पोंगल, बंगाली व गुजराती समाजाचा नवरात्रोत्सव आदी सण उत्सवांचे राज्यातील प्रमुख शहरात आज मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. त्यांच्या कार्यक्रमात गोमंतकीय नागरिक, राजकारणी, महनीय व्यक्ती सहभाग घेत सौहार्दाचे दर्शन घडते. मागील २०-२५ वर्षांत परप्रातीय समाजाच्या या उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

राज्यभरात होतात कार्यक्रम

पणजी गुजराती समाजाद्वारे गरबा, दांडिया कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. पणजीचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री महालक्ष्मी संस्थानातील श्रीकृष्ण मंदिरात गुजराती समाजाद्वारे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. ताळगाव येथे दांडिया मस्ती हा भव्य दांडिया कार्यक्रम नवव्यादिनी साजरा केला जातो. हजारो नागरिक या कार्यक्रमात सहभागी होत असतात. म्हापसा शहरात सर्व समाज एकत्र येत दुर्गा सेवा समितीद्वारे दुर्गा पूजन केले जाते. मडगाव, वास्को, तसेच इतर शहरांतही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन होते.

गुजराती समाज मागील ६० वर्षांहून अधिक कालावधीपासून नवरात्रोत्सव कार्यक्रमाचे पणजीत आयोजन करत आहे. आमच्या समाज संघटनेच्या अधिकृत नोंदणीला यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. आमच्या गुजराती समाजासोबत गोमंतकीय नागरिक मोठ्या प्रमाणात आमच्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून सहभागी होत असतात. तसेच आम्हाला गोवा सरकार तसेच गुजरात पर्यटन महामंडळ व हितचिंतकांद्वारे कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मदत केली जाते.

- लता पारेख, अध्यक्ष, पणजी गुजराती समाज

आम्ही मागील २५ वर्षांपासून दुर्गा पूजनाचे आयोजन करत आहोत. सर्व समाजातील नागरिक एकत्र येऊन दुर्गा पूजा सेवा समितीद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात प्रामुख्याने दांडिया, कविसंमेलन, भजन, तसेच इतर कार्यक्रम करत असतो. आम्ही यथाशक्ती देणगी काढून हा उत्सव साजरा करत आहोत. स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात या आयोजनांमध्ये सहभागी होत असतात.

- रमाकांत पांडे, अध्यक्ष, दूर्गा पूजा सेवा समिती, म्हापसा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com