Bicholim Fire station: डिचोलीत ‘फायर स्टेशन’ला चालना

Bicholim Fire station: संकटांचे ग्रहण : साडेचार वर्षांपासून रखडलेला आधुनिक प्रकल्प
Bicholim Fire station
Bicholim Fire stationDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim Fire station: गेल्या साडेचार वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या शहरातील ‘मॉर्डन फायर स्टेशन’ (अत्याधुनिक अग्निशमन दल केंद्र) प्रकल्पाच्या कामाला आता नव्याने चालना देण्यात आली आहे. साडेचार वर्षांपूर्वी पायाभरणी करण्यात आलेला हा प्रकल्प वेगवेगळ्या कारणांमुळे रखडत गेला. मध्यंतरी कंत्राटदाराने काम सोडूनही दिले.

Bicholim Fire station
CCTV Camera: मुळगाव बगलमार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव : सरपंच तृप्ती गाड

आता या प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढून दुसऱ्या कंत्राटदारामार्फत प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाची आता पूर्तता होणार असल्याचा विश्वासही डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना आहे.

१६ जानेवारी २०१९ या दिवशी विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन सभापती डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. पायाभरणी केल्यानंतर मात्र या प्रकल्पाला एक-एक ग्रहण लागत गेले. पायाभरणी नंतर लगेचच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि या प्रकल्पाच्या बांधकामात अडथळा निर्माण झाला. त्यानंतर सहा महिन्यांनी या प्रकल्पाच्या कामाला चालना मिळाली. काम चालू असतानाच, अडीच वर्षापूर्वी या प्रकल्पाला ‘कोविड’ ची पनवती लागली.

Bicholim Fire station
Goa Electricity: वीज क्षेत्रात राज्याला स्वयंपूर्ण बनवू

महामारीच्या शिरकावानंतर लागू झालेली टाळेबंदी आणि नंतर राज्याबाहेरील मजुरांनी गावचा रस्ता धरल्याने प्रकल्पाच्या कामाला ‘ब्रेक’ लागला. टाळेबंदीनंतर प्रकल्पाच्या कामाला पुन्हा सुरवात झाली.तरी महामारीचे संकट आणि अपुरा कामगारवर्ग यामुळे प्रकल्पाचे काम पुन्हा रेंगाळत गेले. गेल्या वर्षीपासून तर प्रकल्पाचे काम बंदच होतेच. या प्रकल्पाचे ४० टक्केही काम झाले नव्हते. यामुळे या महत्वकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी बनले होते. या प्रकल्पाची पूर्तता कधी होणार त्याबाबतही साशंकता निर्माण झाली होती.

प्रकल्प खर्च वाढण्याची शक्यता

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे येथील आयडीसी परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ५ हजार ४७९ चौरस मीटर जमीन संपादित करण्यात आली असली, तरी २ हजार ४८० चौरस मीटर जागेत प्रकल्पाचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा सुरवातीचा अंदाजित खर्च ११.२८ कोटी असला, तरी काम लांबणीवर पडल्याने हा खर्च आता वाढण्याची शक्यता आहे.

डिचोलीच्या विकासासाठी आपण आग्रही आहे. वेगवेगळ्या अडचणी आणि पूर्वीच्या कंत्राटदाराने काम सोडून दिल्याने ‘मॉडर्न फायर स्टेशन’ हा महत्वाचा प्रकल्प रखडला आहे. सरकार दरबारी प्रयत्न केल्याने अत्याधुनिक अशा या प्रकल्पाला आता नव्याने चालना मिळाली आहे. लांबलेला हा प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत.

-डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार, डिचोली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com