Goa Police: इंस्टाग्रामच्या मदतीने पोलिसांनी लावला चोरीचा छडा

दोनापावल येथील प्रकरण : चोराला शिताफीने अटक; सोने जप्त; रकमेचा वापर जुगारासाठी
पोलिसांनी समाजमाध्यमांच्या आधारे लावला चोरीचा छडा
पोलिसांनी समाजमाध्यमांच्या आधारे लावला चोरीचा छडा Dainik Gomantak
Published on
Updated on

दोनापावल येथील बंगल्यातील 50 लाखांच्या चोरीप्रकरणी पणजी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मिळालेल्या वर्णनाच्या आधारे चोराचा शोध घेताना संशयित सुरेदर छेत्री (31) याला अटक केली.

पोलिसांनी समाजमाध्यमांच्या आधारे लावला चोरीचा छडा
Goa Crime Case: खून, कटकारस्थानाच्या आरोपातून रुलाशा मुक्त

सुरेदरचे फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंट पोलिसांनी शोधून काढले. हे अकाउंट त्याच्या मोबाईलला लिंक होते. त्याने फोन कॉल बंद केले होते. मात्र, फेसबुक व इंस्टाग्रामवर काही मुलींशी बोलण्यात तो सक्रिय होता. त्यामुळे पोलिसांनी एका उत्तर भारतीय तरुणीचा फोटो अपलोड करून बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले व त्याला रिक्वेस्ट पाठवली.

त्याने त्याला लाईक केले व त्यानंतर चॅटिंग सुरू करण्यात आले. त्याला तो प्रतिसाद देत होता. हळूहळू या अकाउंटवरून त्याच्याशी चॅट करत विश्‍वास मिळवला. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी रिक्वेस्ट पाठवण्यात आली. त्याने पश्‍चिम बंगालमधील सिलिगुडी रेल्वे स्थानकावर येण्यास सांगितले व एक मोबाईल क्रमांकही शेअर केला. त्यानुसार पणजी पोलिसांनी पश्‍चिम बंगाल पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली.

पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक संकेत पोखरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तेथे पाठवण्यात आले. या पथकाने सिलिगुडी पोलिसांची मदत घेत चोरट्याशी पुन्हा इंस्टाग्राम व मोबाईलवर संपर्क साधून त्याला भेटण्यास येत असल्याचे मेसेज त्या तरुणीच्या नावाने पाठवले. त्यानेही होकार दिला.

त्यानुसार पोलिसांनी सिलिगुडी रेल्वे स्थानकावर सापळा लावला. चोरट्याचे वर्णन पोलिसांना माहीत होते. रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर पोलिसांनी त्याला इंस्टाग्राम व मोबाईलवरून संपर्क केला असता तो रेल्वे स्थानकावर आला असल्याची माहिती दिली. ताबडतोब साध्या वेशातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी समाजमाध्यमांच्या आधारे लावला चोरीचा छडा
Railway Theft: रेल्वेत दोन चोरीच्या घटना

गुन्हेगारीची पार्श्वभूमी

संशयित सुरेदर छेत्री याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे. यापूर्वी २०१३ मध्ये त्याला बांद्रा पोलिसांनी चोरीप्रकरणी अटक केली होती व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. तो काही महिन्यांपूर्वी गोव्यात आला होता. राज्यातील अनेक भागात तो टेहळणी करून खुल्या असलेल्या बंगले व घरांमध्ये चोऱ्या करत असे. दोनापावल येथेही टेहळणी करत असताना त्याला बंगल्याचे पहिल्या मजल्यावरील दार खुले असल्याचे दिसल्यावर त्याने ही चोरी केली. त्याची ही चोरी पूर्वनियोजित नव्हती.

ट्रान्झिट वॉरंटवर आणले गोव्यात पश्‍चिम बंगाल पोलिसांनी सुरेदरला न्यायालयात हजर केले. त्यानंतर ट्रान्झिट वॉरंटवर त्याला गोव्यात आणून ८ दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली. चौकशीवेळी त्याने चोरलेल्या सोन्यापैकी काही सोने मुंबईतील मालाड-गोरेगाव येथील एका सराफाला विकल्याची तसेच काही एका ठिकाणी ठेवल्याची माहिती मिळाल्यावर ते जप्त करण्यात आले. त्याने चोरलेली रक्कम कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी वापरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Bori Murder Case Goa
Mapusa Police Arrest Murder Suspects
Cole Allen Trump Shooting Manifesto
Altaf Shah Sayyed Gogol Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com