Goa Cricket: 'जीसीए'ची आमसभा तहकूब! अध्यक्ष व सचिव यांच्यातील मतभेद पुन्‍हा उघड

Goa Cricket Association: गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) आमसभा मोठ्या गदारोळात तहकूब करावी लागली. मागील आमसभेच्या इतिवृत्तास मान्यता देण्यावरून दोन गट पडल्याने गोंधळ माजला. तसेच आरोप-प्रत्यारोपही झाले.
Goa Cricket Association
Goa Cricket AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cricket Association (GCA) Annual Meeting Dispute

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) आमसभा रविवारी मोठ्या गदारोळात तहकूब करावी लागली. मागील आमसभेच्या इतिवृत्तास मान्यता देण्यावरून दोन गट पडल्याने गोंधळ माजला. तसेच आरोप-प्रत्यारोपही झाले. या पार्श्वभूमीवर आमसभा तहकूब करण्याची वेळ आली.

जीसीएचे अध्यक्ष विपुल फडके आणि सचिव रोहन गावस देसाई यांच्यातील मतभेद या आमसभेत उघडपणे दिसून आले. जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीत दोन गट आहेत. यामध्ये अध्यक्ष व सचिव यांची तोंडे दोन दिशांना असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. दरम्‍यान, जीसीएतील मतभेद राज्यातील क्रिकेटला मारक असल्याचे मत आमसभेनंतर क्लब प्रतिनिधींनी व्यक्त केले.

एका क्लब प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, जीसीए आमसभेत दोन इतिवृत्ते आली. यामध्ये गतवर्षी ८ ऑक्टोबरला झालेल्या आमसभेचे इतिवृत्त सचिव रोहन गावस देसाई यांनी सर्व क्लबना यावेळच्या आमसभेनिमित्त पाठविले होते, तर अध्यक्ष विपुल फडके हे प्रतिज्ञापत्र सादर केलेले इतिवृत्त घेऊन आले होते. सचिवांनी सादर केलेल्या इतिवृत्तात घोळ आणि बनाव असल्याचा दावा अध्यक्षांचा होता. यावरून सुरवातीलाच वाद झाला. काही क्लब प्रतिनिधींनी सचिवांनी सादर केलेले इतिवृत्त मंजूर करण्यासाठी आग्रह धरला. त्यावरून वातावरण तंग झाले. शेवटी आमसभा तहकूब करण्‍यात आली.

याप्रकरणी विपुल फडके आणि रोहन गावस देसाई यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. आता तहकूब झालेली आमसभा पुन्हा कधी बोलावण्यात येईल, याकडे जीसीए संलग्न क्लबांचे लक्ष लागून राहिले आहे.

यापूर्वीही उद्‌भवला होता तांत्रिक पेच

जीसीएची आमसभा ५ ऑक्टोबरला होणार होती. त्यासंदर्भात २१ दिवस अगोदर नोटीस देणे आवश्यक होते. परंतु प्रमुख पदाधिकाऱ्याने अंदाजपत्रकावर सही केली नसल्याचा दावा केल्यामुळे तांत्रिक पेच निर्माण होऊन आमसभा पुढे ढकलावी लागली व ती २० ऑक्टोबर रोजी घेण्याचे ठरले.

Goa Cricket Association
Goa Crime: ..अखेर अट्टल गुन्हेगार गजाआड! 100 घरफोड्यांमध्ये सहभाग; जुने गोवे पोलिसांची यशस्वी कामगिरी

प्रकरण न्यायालयात जाणार?

आमसभेतील गोंधळ, सादर झालेली दोन इतिवृत्ते या प्रकरणी काही क्लब प्रतिनिधी न्यायालयात धाव घेण्याच्या प्रयत्नात आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे एका क्लब प्रतिनिधीने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com