Corona Virus Update: संसर्ग वाढतोय

काेरोनाचे नवे169 रुग्ण; 3 राज्यांत मास्क अनिवार्य
Corona Virus Update |Goa
Corona Virus Update |GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Corona Virus Update: मार्च महिन्याच्या मध्यापासून वाढणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव आजही कायम राहिला. आज राज्यात नवे 169 बाधित रुग्ण सापडले असून 14 जणांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केले, अशी माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

दुसरीकडे, देशभर कोरोना बाधित आणि उपचार घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच कारणास्तव हरियाणा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील काही जिल्ह्यांमध्ये मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

गोवा सरकारच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी म्हणाले की, राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.

ही उच्चांकी संख्येची (पीक पिरियड्स) सुरुवात आहे. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता असून सध्या तरी नागरिकांनी काळजी

घेणे गरजेचे आहे. यासाठीच आम्ही आज नव्याने नियमावली जाहीर केली आहे. तर उपचारासाठी सर्व उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष उभारले असून काही खाटा राखीव ठेवल्या आहेत. राज्यातील बहुतांश खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारले आहेत.

Corona Virus Update |Goa
Ponda News: कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याची आवश्यकता - कृषीमंत्री रवी नाईक

तीन राज्यांत मास्क अनिवार्य

देशातील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता हरियाणा, महाराष्ट्र, तामिळनाडूच्या काही जिल्ह्यांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 3038 नवीन रुग्ण आढळले.

देशात रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 21179 वर.

दिल्ली, पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू.

जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू.

देशातील मृतांचा आकडा पोहोचला 530910 वर.

हरियाणा सरकारने 100 हून अधिक लोकांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणी मास्क केला अनिवार्य.

महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील सरकारी कार्यालये, महाविद्यालये आणि बँकांमध्ये मास्क बंधनकारक.

तमिळनाडूत 1 एप्रिलपासून मास्क अनिवार्य.

Corona Virus Update |Goa
Margao Woman Assaulted: कुत्रा भुंकल्याच्या वादातून मडगावात महिलेवर प्राणघातक हल्ला

इस्पितळांत स्वतंत्र कक्ष

राज्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन वृद्ध, आजारी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. यासाठी सर्व उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने केली आहे.

त्यानुसार बहुतांश रुग्णालयांत स्वतंत्र खाटांची व्यवस्था केली आहे. याबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही स्वतंत्र कक्ष सुरू केले आहेत, अशी माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com