Chhatrapati Shivaji Maharaj: राज्यात उद्यापासून ‘शिवशौर्य यात्रे’चे आयोजन

Chhatrapati Shivaji Maharaj: विश्‍व हिंदू परिषद तथा बजरंग दल गोवातर्फे शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून 1 ऑक्टोबर रोजी बेतूल किल्ल्यावरून या यात्रेला सुरवात होणार असल्याचे विश्‍व हिंदू परिषदेचे गोवा विभाग प्रमुख मोहन आमशेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak
Published on
Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून विश्‍व हिंदू परिषद तथा बजरंग दल गोवातर्फे शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून 1 ऑक्टोबर रोजी बेतूल किल्ल्यावरून या यात्रेला सुरवात होणार असल्याचे विश्‍व हिंदू परिषदेचे गोवा विभाग प्रमुख मोहन आमशेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Chhatrapati Shivaji Maharaj
Worms In Mid-Day Meal: माध्यान्ह आहाराचे कंत्राट एजन्सींना देण्यासाठी स्वयंसाहाय्य गटांना लक्ष्य

यावेळी बजरंग दल गोवा संयोजक बनेश नाईक उपस्थित होते. दरम्यान, आमशेकर म्हणाले, या यात्रेच्या शुभारंभप्रसंगी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई तसेच बजरंग दल कोकण क्षेत्र प्रमुख विवेकजी कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत, तर ८ ऑक्टोबर रोजी म्हापसा येथे होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच अखिल भारतीय बजरंग दल प्रमुख नीरज दणोरिया उपस्थित राहणार आहेत.

गोव्यात यात्रा कशासाठी?

परकीय आक्रमनांनी धर्मांतरण करून आम्ही आमची संस्कृती सोडावी यासाठी प्रयत्न केले. हिंदूंचा छळ केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी करून छळ थांबवला. छत्रपतींना आपल्या जीवनात अनेकदा माघार घ्यावी लागली, परंतु त्यांनी हार न मानता नव्याने स्वराज्य उभे केले. त्यांची ही शिकवण आज प्रत्येक भारतीयाने आत्मसात करावी, त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी यासाठी या यात्रेचे आयोजन केल्याचे आमशेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com