Goa GMC: गोमेकॉत इफिकॉन’ परिषद आरोग्यंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन

Goa GMC: आरोग्यंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन: आजारांचे निदान व उपचार यासंदर्भात होणार चर्चा
 Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Goa GMC: एपिडेमियोलॉजी फाउंडेशन ऑफ इंडियाची ‘इफिकॉन - 2023’ ही चौथी राष्ट्रीय परिषद गोमेकॉ सभागृहात उद्या 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर असे दोन दिवस आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्‍घाटन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या हस्ते होणार आहे.

 Vishwajeet Rane
Chhatrapati Shivaji Maharaj: राज्यात उद्यापासून ‘शिवशौर्य यात्रे’चे आयोजन

या परिषदेत विविध आजारांचे निदान व उपचार यासंदर्भात चर्चा होणार असून देशभरातील तज्ज्ञ व संशोधक डॉक्टर सहभागी होणार आहेत, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

या परिषदेत लहान मुलांसाठी अयोग्य आहार, कुपोषण रोखणे, महिला व मुलांमधील अशक्तपणा, क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी व त्याचे 2025 पर्यंत उच्चाटन करण्याच्या रणनीतीवरही राष्ट्रीय तज्ज्ञांची चर्चा होणार आहे.

या चर्चेत देशभरातील नामवंत शास्रज्ञ डॉ. अश्रफ, डॉ. फारूक, डॉ. विकास भाटिया, डॉ. व्ही. एम. कटोच, डॉ. ए. एम. कादरी यांचा समावेश असेल.

या पत्रकार परिषदेस गोमेकॉ इस्पितळाचे डॉ. जगदीश काकोडकर, एपिडेमियोलॉजी विभागाच्या डॉ. वनिता पिंटो, डॉ. संदीप सरदेसाई उपस्थित होते. याव्यतिरिक्त या परिषदेच्या आयोजन समितीचे प्रा. उमेश कपिल, प्रा. प्रदीप अगरवाल, प्रा. भारद्वाज व प्रा. अजित सहाय हेसुद्धा उपस्थित होते.

या परिषदेची सुरुवात उद्या 30 रोजी सकाळी 8.50 वा. डॉ. आर. के. श्रीवास्तव यांच्या संधोशन सत्राने होणार आहे. त्यानंतर रिसर्च ट्रायंगल इन्स्टिट्यूय (आरटीआय), नॅशन हेल्थ सिस्टीम रिसोर्स सेंटर (एनएचएसआरसी), वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ), इको इंडिया, युनिसेफ, ग्लोबल हेल्थ अडव्होकसी इनक्युबेटर (जीएचएआय), पाथ, गेन, द युनियन, नॅशनल टीबी उच्चाटन कार्यक्रम (एनटीईपी),

सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नेचरोपथी (सीसीआरवायएन) या आरोग्यसंबंधित संस्थांमार्फत विविध आजारांवर व उपचाराबाबत माहिती सादर करून त्यावर पॅनलची चर्चा होणार आहे. व्ही. के. श्रीवास्तव वक्तृत्वावर गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, तर अभया इंद्रायन वक्तृत्वावर पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय झोडपे हे व्याख्यान देणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com