Mahadayi Water Dispute: म्‍हादईप्रश्‍‍नी काँग्रेसचे आंदोलन दिखावा- ढवळीकर

डीपीआर व निधीची तरतूद रद्द करण्‍यास कर्नाटकला भाग पाडावे
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute कर्नाटकात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आहे. म्हादईसाठीचा डीपीआर तसेच अर्थसंकल्पात सुमारे 500 कोटी निधीची केलेली तरतूद रद्द करण्यास आता गोवा काँग्रेसने सांगावे. म्हादईप्रश्‍नी गोवा काँग्रेसने सुरू केलेले आंदोलन हा दिखावा आहे.

त्यामुळे काँग्रेस या आंदोलनाबाबत कितपत गंभीर आहे हे त्यांनी कर्नाटक सरकारच्या म्हादईप्रश्‍नी घेतलेल्या भूमिकेवर अवलंबून आहे. कर्नाटकचा डीपीआर व निधीची तरतूद रद्द करून गोवा काँग्रेसने दाखवावी, असे आव्हान मगोचे ज्‍येष्‍ठ नेते तथा मंत्री सुदिन ढवळकीर यांनी दिले.

Sudin Dhavalikar
Mopa Airport: बाबू आजगावकर यांच्‍यामुळेच पेडणेवासीय लाभापासून वंचित

म्हादईच्या रक्षणासाठी मगोने वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आहे. म्हादईचे पाणी कोणत्याही परिस्थितीत वळवून न देण्याचा तसेच बंधारा बांधण्यास विरोध केला आहे. मगोने जेव्हा म्हादई पाणीप्रश्‍नी आंदोलन सुरू केले होते तेव्हा इतर राजकीय पक्ष निद्रितावस्थेत होते.

कर्नाटकात म्हादई प्रश्‍नावरून निवडणूक लढविली गेली. कर्नाटक व गोवा काँग्रेसची म्हादईप्रश्‍नी भूमिका दुटप्पीपणाची आहे, असा आरोप ढवळीकर यांनी केला.

Sudin Dhavalikar
Amarnath Panjikar: स्मार्ट सिटी बनली ‘मिशन टोटल कमिशन’- काँग्रेस

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार म्हादईचे पाणी तेथील लोकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहे, तर गोवा काँग्रेस त्याविरुद्ध आंदोलन छेडत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची म्हादईप्रश्‍नी भूमिका स्पष्ट नाही हे स्‍पष्‍ट होते.

गोवा काँग्रेस कर्नाटकच्या डीपीआरला विरोध करणार असे सांगत असले तरी कर्नाटक काँग्रेसने मात्र त्यास कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. ते मतदारांना दिलेल्या आश्‍‍वासनाशी सध्या ठाम आहे. त्यामुळे काँग्रेसचे गोव्यातील आंदोलन कितपत खरे आहे ते तेच जाणो, असे ढवळीकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com