Amarnath Panjikar: स्मार्ट सिटी बनली ‘मिशन टोटल कमिशन’- काँग्रेस

स्मार्ट सिटीची कामे अकल्पनीय ठरली आहेत.
Amarnath Panjikar
Amarnath PanjikarDainik Gomantak

Smart City: पणजी ‘स्मार्ट सिटी’ची कामे निकृष्ट असून सल्लागाराला दिलेले ८ कोटी रुपये वाया गेल्याचे मत पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केल्याने राजधानीचे ‘डर्ट सिटी’मध्ये रुपांतर झाल्याचे उघड झाले आहे.

त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसने यापूर्वी केलेल्या ‘मिशन टोटल कमिशन’ या घोषणेला पुष्‍टी मिळत आहे, असा टोला प्रदेश काँग्रेसचे मींडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी लगावला.

बाबूश यांनी दीड वर्षांपूर्वी जाहीर केलेला 70 कोटींचा सार्वजनिक बांधकाम खात्यातील कनिष्ठ अभियंता भरती घोटाळ्याचा परिणाम म्हणून सदर पदे रद्द करणे भाजप सरकारला भाग पडले होते.

Amarnath Panjikar
Mopa Airport: बाबू आजगावकर यांच्‍यामुळेच पेडणेवासीय लाभापासून वंचित

तसेच तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पावसकर यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली होती. आता बाबूश यांनी केलेल्‍या वक्तव्यामुळे नगरविकासमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनाही बिस्तर गुंडाळायला भाग पडेल, असे पणजीकर म्‍हणाले.

स्मार्ट सिटीची कामे अकल्पनीय ठरली आहेत. निदर्शनांनंतरही मंत्री राणे यांनी मौन बाळगले आहे. ते भाजपच्या ‘मिशन टोटल कमिशन’चा भाग आहेत आणि त्यामुळेच कामाची पाहणी करून कंत्राटदारांवर कारवाई करण्याची हिंमत त्यांच्यात नाही, असा आरोप पणजीकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com