Mopa Airport: बाबू आजगावकर यांच्‍यामुळेच पेडणेवासीय लाभापासून वंचित

प्रवीण आर्लेकर : मोपा विमानतळावर टॅक्सी स्टँड लवकरच
Pernem
PernemDainik Gomantak

Mopa Airport "मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थानिकांच्‍या जमिनी गेल्या. माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी स्थानिकांना नोकऱ्या तसेच इतर लाभांपासून वंचित ठेवले. आंदोलनातही सहभागी झाले नाहीत.

त्यामुळे आता स्थानिकांना त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जो त्रास होतोय, त्यास आजगावकर हेच जबाबदार आहेत", असा आरोप आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केला.

पेडणेतील टॅक्सीचालकांना लवकरच विमानतळ आवारात टॅक्सी स्‍टँड मिळणार असून त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pernem
Huma Qureshi :...अन् बेडकाने हुमाला किस केला, पाहा गोव्यातून तिनेच शेअर केलेले व्हायरल फोटो

मोपा टॅक्सी संघटनेचा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी सोडविला आहे व त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही प्रक्रिया करावी लागत असल्याने त्यांना या विमानतळावर टॅक्सी स्टँड मिळण्यास उशीर होत आहे.

मात्र त्यांना या विमानतळावर टॅक्सी स्टँड मिळवून देणारच. विमानतळाचे काम सुरू असताना बाबू आजगावकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी बोलून स्‍थानिकांच्‍या समस्या व मागण्यांवर भर देऊन त्या पूर्ण केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती.

जीएमआर कंपनीशी रितसर करार झाला असता तर स्थानिकांना त्यांच्या हक्कासाठी आता त्रास झाला नसता. टॅक्सीव्यावसायिकांनाही विमानतळावर टॅक्सी स्टँड मिळाला असता, असे आर्लेकर म्‍हणाले.

Pernem
Goa Forward: नागरीपुरवठा खात्याच्या 'त्या' प्रकाराबाबत गोवा फॉरवर्डचा घेराव; शुक्रवारपर्यंत कारवाई न झाल्यास...

बाबूंचे नाव ऐकताच होते चिडचिड...

माजी मंत्री बाबू आजगावकर यांनी पेडणे मतदारसंघात स्थानिक लोकांना भेटण्यास सुरूवात केली आहे. लोकांच्या समस्या ऐकून घेताना ते विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर खापर फोडत आहेत.

याबाबत आमदार आर्लेकर यांना पत्रकारांनी डिवचले असता ते म्‍हणाले की, मला पुन्हा पुन्हा बाबू आजगावकर यांचे नाव घेऊन काही विचारू नका.

त्यांनी आपल्‍या मागील कारकिर्दीत काय केले हे लोकांनी पाहिले आहे आणि म्हणूनच मला निवडून दिले आहे. त्यांचे नाव ऐकल्यावर माझ्या मनात चिडचिड निर्माण होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com