Indian Panorama In Iffi: इंडियन पॅनोरमाचा पडदा उघडला; 45 चित्रपटांची मेजवानी सिनेरसिकांसाठी खुली

अनुरागसिंग ठाकूर ःभारतीय सिनेमांना जागतिक व्यासपीठ
53 IFFI Goa
53 IFFI GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय कला, संस्कृती, समाजजीवनाचे भावविश्व आणि कलात्मकता यांचे दर्शन म्हणजेच इंडियन पॅनोरमा असून या विभागामुळे भारतीय सिनेमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळत असल्याचे मत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी व्यक्त केले. 53 व्या इफ्फीमध्ये आज मंत्री ठाकूर यांच्या हस्ते ‘इंडियन पॅनोरमा’ ची सुरुवात करण्यात आली. आयबी मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे सीईओ रवींद्र भाकर उपस्थित होते.

(The Indian Panorama to begin at International Film Festival of India in Goa)

53 IFFI Goa
Pramod Sawant Dialogue At Iffi: ठाकूर यांचा आग्रह मुख्यमंत्री सावंतांचा फिल्मी डायलॉग, मग टाळ्या अन् शिट्या...

यंदा इंडियन पॅनोरमात 45 चित्रपटांचे प्रदर्शन होत असून पूर्ण लांबीचे 25 फीचर फिल्म तर 20 लघुपटांचे (नॉन फीचर फिल्म) प्रदर्शन होत आहे. आज या विभागाची सुरुवात कन्नड चित्रपट निर्माते पृथ्वी कोननुर यांच्या हदीनेलेंटू या चित्रपटाने तर दिव्या कावासजी यांच्या शो मस्ट गो लघुपटाने होणार झाली.

53 IFFI Goa
IFFI 2022 Opening Ceremony In Goa: इफ्फीत उद्‌घाटनापूर्वीच उघडला पडदा!

आयनॉक्स थिएटरमध्ये आयोजित कार्यक्रमात इंडियन पॅनोरमा विभागाच्या फीचर फिल्म आणि नॉन फीचर फिल्मच्या परीक्षकांचे सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर हदीनेलेंटू आणि ‘शो मस्ट गो ऑन’ या चित्रपटांच्या दिग्दर्शकांसह कलाकारांचे मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

मंत्री ठाकूर म्हणाले, इंडियन पॅनोरमा हा या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील महत्त्वाचा विभाग आहे. या विभागामार्फत भारतीय भाषेतील सिनेमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळते. भारतीय सिनेमा आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि समीक्षकांसमोर जातो हे या विभागाचे श्रेय आहे. या विभागात 5 मराठी तर ‘वागरो’ कोकणी चित्रपटांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com