IFFI 2022 Opening Ceremony In Goa: इफ्फीत उद्‌घाटनापूर्वीच उघडला पडदा!

IFFI 2022 Opening Ceremony In Goa: इफ्फीच्‍या इतिहासात पहिल्यांदाच घडला प्रकार ; ‘अल्मा अँण्‍ड ऑस्कर’ने महोत्‍सवाला उत्‍साहात प्रारंभ
IFFI 2022 Opening Ceremony in Goa
IFFI 2022 Opening Ceremony in Goa Dainik Gomantak

IFFI 2022 Opening Ceremony In Goa: गोव्‍यात 53व्‍या आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाला (इफ्‍फी) प्रारंभ झाला. 2004 पासून गोव्यात रुळू पाहणाऱ्या या महोत्‍सवात पहिल्यांदाच उद्घाटनापूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाने पडदा उघडला गेला.

अत्यंत उत्कट, कलात्मक भावविश्वाचा अविष्कार असलेल्या ‘अल्मा’ आणि ‘ऑस्कर’ चित्रपटाने पुढे आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची खऱ्या अर्थाने आश्वासक सुरवात केली आहे.

आता आजपासून सुमारे 500 भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी इफ्फीमधील प्रोजेक्टर सज्ज झालेले आहेत.

पहिल्यांदाच या चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडे (एनएफडीसी) आली असून त्यांनी कान्सच्या धर्तीवर उद्घाटनापेक्षा चित्रपटांना महत्व दिल्याचे दिसत आहे.

ऑस्ट्रियन दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या ‘अल्मा’ आणि ‘ऑस्कर’ या चित्रपटांनी महोत्सवाची दिमाखदार सुरवात झाली. कलाकारांच्या जीवनाची गुंतागुंत उलगडून दाखवणारी कथा दिग्दर्शक मांडण्यात यशस्वी झाला आहे.

एकूणच ‘ओपनिंग फिल्म’ आश्वासक आणि वेगळा आयाम देणारी ठरल्याने पुढील आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची रंगत वाढत जाईल.

सुवर्णमयुरासाठी 15 चित्रपटांमध्ये चुरस

यंदाच्‍या इफ्‍फीत 79 देशांतील 280 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटांपैकी 30 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त म्हणजे 50 ते 60 चित्रपट पेक्षा जास्त महिलांचे असतील. जीवन गौरव पुरस्कार, आयसीएफटी -युनेस्को गांधी मिडेल चित्रपट, बेस्ट डेब्यू फीचर फिल्म, फेस्टिवल कॅलिडोस्कोप, सिनेमा ऑफ द वर्ल्ड, ॲनिमेशन, इंटरनेट, कंट्री फोकस अशा विविध विभागांत चित्रपटांचे प्रदर्शन होईल.

IFFI 2022 Opening Ceremony in Goa
Goa IFFI 53 Updates: 'गोव्यात 2025 पर्यंत साकारणार इफ्फी भवन'- प्रमोद सावंत

यापैकी 60 चित्रपटांचा वर्ल्ड प्रीमियर होत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 चित्रपटांमध्ये प्रतिष्ठेच्या सुवर्णमयुरासाठी चुरस आहे. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या मालिकेत 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

‘कंट्री फोकस’मध्‍ये 8 सिनेमांचे प्रदर्शन

श्रद्धांजली (होमेज) विभागात 15 भारतीय आणि 5आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. त्‍यात लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहरी, भूपेंद्र सिंग, कृष्णकुमार कुन्हात, बिरजू महाराज, शिवकुमार शर्मा यांच्या चित्रपटांचा समावेश आहे.

IFFI 2022 Opening Ceremony in Goa
IFFI 2022 Opening Ceremony In Goa: आगळ्‍यावेगळ्‍या उद्‌घाटनाचे स्‍वागत

मणिपूरच्या 5 फीचर आणि 5 नॉन फीचर चित्रपटांचा प्रदर्शन करण्‍यात येईल. यंदा फ्रान्स हा स्पॉटलाईट देश असून कंट्री फोकस पॅकेजअंतर्गत 8 चित्रपट दाखविण्‍यात येणार आहेत.

इंडियन पॅनोरमा विभागात यंदा 45 चित्रपटांची निवड झाली आहे. 25 चित्रपट हे मोठे फीचर फिल्म सदरातील असून 20 चित्रपट लघुपट श्रेणीतील आहेत. यात मराठीतील 5 आणि एका कोकणी चित्रपटाचा समावेश आहे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रयत्नातून रिस्टोर्ड क्लासिक्सच्या 4 चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्‍या आशा पारेख यांच्या ‘तिसरी मंजल’, ‘दो बदन’ आणि ‘कटी पतंग’ हे चित्रपट दाखविण्‍यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com