Pramod Sawant Dialogue At Iffi: ठाकूर यांचा आग्रह मुख्यमंत्री सावंतांचा फिल्मी डायलॉग, मग टाळ्या अन् शिट्या...

इफ्फीचा उद्धाटन कार्यक्रमावेळी एक किस्सा घडला जो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Pramod Sawant Dialogue At Iffi
Pramod Sawant Dialogue At IffiDainik Gomantak

Pramod Sawant Dialogue At Iffi: गोव्यात रविवारी (दि.20) 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) जल्लोषात सुरूवात झाली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर मैदानात इफ्फीचा रेड कार्पेट आणि उद्धाटन समारंभ पार पडला. इफ्फीसाठी (Iffi) जगभरातील सिनेरसिकांनी हजेरी लावली आहे. बॉलिवूडसह अनेक हॉलिवूड कलाकारांनी देखील गोव्यात हजेरी लावली आहे. रविवारी उद्धाटन कार्यक्रमात सत्कार, भाषण आणि पुरस्कार वितरण झाल्यानंतर रात्री उशीरा बॉलिवूड कलाकारांनी (Bollywood Celebrity At Iffi Goa) परफॉर्मन्स सादर केले.

Pramod Sawant Dialogue At Iffi
IFFI Opening Ceremony: सारा, मृणालच्या अदा, कार्तिक, वरूनचा जलवा; गोव्यात इफ्फीची धूम

सुप्रसिद्ध अभिनेता वरून धवन, कार्तिक आर्यन, अभिनेत्री सारा अली खान, अमृता खानविलकर आणि मृणाल ठाकूर यांनी यावेळी परफॉर्मन्स सादर केले. या कार्यक्रमाचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur), गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्यासह विविध कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमावेळी एक किस्सा घडला जो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तर झाले असे की अभिनेत्री सारा अली खान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना प्रश्न विचारण्यासाठी जवळ आली. यावेळी अनुराग ठाकूर यांनी उपस्थित प्रेक्षकांना उद्देशून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा डायलॉग ऐकणार का? असा प्रश्न केला. प्रमोद सावंत लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना विचारलं तर ते हेच म्हणतील 'हिंदुस्तान लाजवाब था, लाजवाब है और लाजवाब रहेगा,' असा डायलॉग अनुराग ठाकूर यांना म्हटला.

त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माईक हातात घेऊन, "मोदीजी है तो भिवपाची गरज ना!" असा डायलॉग म्हटला. यानंतर लोकांनी टाळ्या अन् शिट्या वाजवत एकच जल्लोष केला.

Pramod Sawant Dialogue At Iffi
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका, केली मोठी मागणी

दरम्यान, अभिनेत्री सारा अली खानने देखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे डायलॉगनंतर कौतुक केले. "तुम्ही चांगले राजकारणी तर आहातच पण उत्तम कलाकार देखील आहात हे दाखवून दिलेत." असे सारा अली खान दोघांचे कौतुक करताना म्हणाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com