गोव्याच्या परिवहन विभागाकडे ना कमर्शियल वाहनांचा डेटा, ना महसूल; काँग्रेसकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी...

अमित पाटकर यांनी धरले धारेवर; सांडपाणी वाहतूक करणाऱ्या पाणी टँकरवर कारवाईच नाही
Amit Patkar
Amit Patkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Congress Leader Amit Patkar: गोव्यातील टँकर तसेच इतर व्यापारी वाहनांकडून वाहतूक विभागाला कोणताच महसूल मिळत नाही. गोव्यात व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा कोणताही डेटा परिवहन विभागाकडे नाही.

भाजप सरकार राज्याला शून्य महसूल देणाऱ्या टँकर आणि व्यावसायिक वाहन माफियांना प्रोत्साहन देत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

पाटकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने परिवहन संचालकांची भेट घेत त्यांना दोन निवेदने दिली. यावेळी पाटकर यांनी कागदपत्रे दाखवत अधिकाऱ्यांना जाब विचारून धारेवर धरले.

Amit Patkar
Mopa Taxi Driver Protest: मोपा येथे जमावबंदीनंतरही टॅक्सीचालकांचे आंदोलन सुरूच

सांडपाणी वाहतूक करणाऱ्या पाण्याच्या टँकरवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसने वाहतूक खात्यात घुसून संचालक राजन सातार्डेकर यांची खरडपट्टी काढली. राज्यातील वाढत्या अपघातांबाबतही जाब विचारला.

बेकायदेशीर टँकर चालवणाऱ्यांवर कारवाई करणे आणि रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्याच्या मागणीसाठी परिवहन संचालकांना दोन निवेदने दिली.

पाटकर म्हणाले की, गोवा विधानसभेतील लेखी उत्तरावरुन गोव्यात व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणार्‍या केवळ 26 दुचाकी आहेत. याचा अर्थ सरकारला व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रक, पिकअप, रिक्षा तसेच इतर वाहनांकडून महसूल मिळत नसल्याचे स्पष्ट आहे.

सांडपाणी वाहतूक करणाऱ्या पाणी टँकरवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे परिवहन संचालकांनी मान्य केले. आम्ही दबाव आणल्यानंतर त्यांनी आता कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Amit Patkar
Francisco Sardinha: चर्चिल आता निवडून येणे शक्य नाही; कुडतरी किंवा बाणावलीतुनही नाही!

मेरशी जंक्शनवर लावलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिग्नलचे तीन तेरा वाजले आहेत. या सिग्नलमुळे जंक्शनवर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. राज्यातील टँकर माफियांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशीची व्हावी, असेही पाटकर म्हणाले.

काँग्रेसच्या शिष्टमंडळात अमरनाथ पणजीकर, एव्हरसन वालीस, मनीषा उसगावकर, अर्चित नाईक, जॉन नाझरेथ, विजय भिके, विवेक डिसिल्वा, सुदिन नाईक आदींचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com