Mopa Taxi Driver Protest: मोपा येथे जमावबंदीनंतरही टॅक्सीचालकांचे आंदोलन सुरूच

सरकारने आश्वासन देऊन फसवणूक केल्याची भावना
Mopa Taxi Driver Protest
Mopa Taxi Driver ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

Mopa Taxi Driver Protest: मोपा-पेडणे येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर अधिसूचना काढून जोपर्यंत टॅक्सी स्टॅण्डची आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे, असा इशारा ग्रीन फिल्ड मोपा एअर पोर्ट टॅक्सी असोसिएशन व मोपा लोकल टॅक्सी असोसिएशनतर्फे देण्‍यात आला.

या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात 144 हे जबावबंदीचे कलम लावण्‍यात आले आहे. त्‍यानंतर आज सकाळपासून आंदोलकांनी पेडणे येथील सरकारी संकुलासमोरील पालिका उद्यानात धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Mopa Taxi Driver Protest
Francisco Sardinha: चर्चिल आता निवडून येणे शक्य नाही; कुडतरी किंवा बाणावलीतुनही नाही!

यावेळी बोलताना संघटनेचे नेते भास्कर नारुलकर म्हणाले की, आम्ही गेल्‍या पाच महिन्यांपासून मोपा विमानतळावर टॅक्सी स्टॅण्‍डची मागणी शांततेच्‍या मार्गाने करत आहोत. पण प्रत्येक वेळी सरकारने आश्वासन देऊन आमची फसवणूक केली.

या अनुभवामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनावर आमचा विश्वास नसल्याने आम्ही आज दुपारी एक वाजेपर्यंतची दिलेली मुदत संपल्याने आंदोलन सुरुच ठेवणार आहोत. आमची सहनशक्ती आता संपलेली आहे. आम्हाला अटक करा किंवा आमचे वाट्टेल ते करा, पण लढा सुरूच ठेवू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

यावेळी ॲड जितेंद्र गावकर, दीपक कळंगुटकर, ॲड. प्रसाद शहापूरकर, ॲड. शैलेश गावस, उत्तर गोवा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत, गंगाराम फडते, रमाकांत तुळसकर आदींची भाषणे झाली. या सर्वांनी आमदार, वाहतूकमंत्री व मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.

Mopa Taxi Driver Protest
Goa's Walking Nurse: गोव्यातील 84 वर्षांची 'वॉकिंग नर्स'; निवृत्तीनंतरही करते रुग्णांची विनामोबदला सेवा

पुढील 60 दिवस विमानतळ परिसरात जमावबंदी

पेडणे तालुक्यातील टॅक्सीचालकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात जमावबंदीचे 144 कलम लागू केले आहे. या आदेशानुसार विमानतळ परिसरात 500 मीटरपर्यंत आणि जवळच्या गावांमध्ये हे कलम लागू असेल.

विमानतळावर स्थानिक टॅक्सींसाठी स्वतंत्र काऊंटर उभारावा, काळ्‍या-पिवळ्या टॅक्सींना प्राधान्य मिळावे आणि ओला - उबेरसारख्या टॅक्सी सेवा सुरू करू नयेत या मागणीसाठी ‘टुगेदर फॉर पेडणेकर’ या संघटनेच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

आता या आंदोलकांनी कायदा हातात घेण्याची भाषा करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने विमानतळाच्या भोवती 500 मीटरपर्यंत आणि नागझर, वारखंड, उगवे, मोपा, चांदेल, हंसापूर, कासारवर्णे या गावांत हे जमावबंदीचे 144 कलम लागू केले आहे.

यापुढे हे कलम 60 दिवस असणार असून राष्ट्रीय महामार्ग 66 धारगळ पासून हे कलम लागू असेल, असे उत्तर गोवा न्यायदंडाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com