गोव्यात काँग्रेसच्या पक्षांतर्गत लाथाळ्यामुळे पराभव ओढवला

पराभूत उमेदवारांच्या प्रदेश काँग्रेस बैठकीत तक्रारी
The Congress party was defeated due to internal politics Candidate Criticism
The Congress party was defeated due to internal politics Candidate CriticismDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची आज प्रदेश काँग्रेस कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी उमेदवारांना त्यांच्या पराभवा मागील कारणे तसेच पक्षविरोधात झालेल्या कारवाया यासंदर्भातचा अहवाल देण्यास सांगण्यात आले. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish-Chodankar) हे उपस्थित राहू न शकल्याने आमदार व वरिष्ठ नेते दिगंबर कामत यांनी ही बैठक घेतली व यावेळी बहुतेक उमेदवारांनी मतविभाजन तसेच काही कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय न झाल्याची माहिती दिली.

या बैठकीला काँग्रेसचे बहुतेक पराभूत उपस्थित होते. त्यामध्ये साखळीचे उमेदवार धर्मेश सगलानी, टोनी फर्नांडिस, सुधीर कांदोळकर, वेनान्सिओ सिमोईश, राजन वेरेकर उपस्थित होते. काँग्रेसचे राज्यात वातावरण होते. मात्र, रेव्होल्युशन गोअन्स तसेच ऐनवेळी पक्षामध्ये प्रवेश केलेल्यांना बूथ समित्यांवर नियुक्ती झाल्याने त्याचा फटका उमेदवारांना बसल्याची तक्रार यावेळी करण्यात आल्या. मतविभाजन होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार लोकांची मते मिळवण्यात कोठे तरी कमी पडले हे दिसून आले.

The Congress party was defeated due to internal politics Candidate Criticism
अज्ञातानं कचऱ्याला लावली लाग, अडीच लाखांचे नुकसान

सात ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार हे आरजी पक्षाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा कमी फरकाने पराभूत झाले आहेत. भाजपविरोधात लोकांनी मत करताना आरजीला मते दिली त्याचा मोठा फरक जाणवला व भाजपला आयतीच संधी मिळाली. त्यामुळे येत्या पंचायत निवडणुकीसाठी (Election) काँग्रेसने पुन्हा एकमताने पक्ष बळकटीसाठी कामाला लागण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उमेदवारांनी ज्या समस्या तसेच कारणे दिली आहेत ती लेखी स्वरुपात अहवाल द्या असे कामत यांनी सांगितले. त्याचा अभ्यास करून पक्षाकडून योग्य ती कारवाई प्रदेशाध्यक्ष करतील असे ते म्हणाले.

The Congress party was defeated due to internal politics Candidate Criticism
सासष्टीत गांजाचा विळखा

साखळीचे उमेदवार धर्मेश सगलानी म्हणाले की, साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा व सरकारी यंत्रणेचा वापर झाला. टपाली मते व ज्येष्ठ नागरिकांची 90 टक्के मते ही भाजपला (BJP) मिळाली हे कोडेच आहे. लोकांवर दबाव आणून तसेच मोठी आमिषे दाखवून मते घेण्यात आली आहेत. या मतांबाबत मोठा घोळ झाला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे 666 मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांना 455 टपाली मते मिळाली तसेच घरामधील ज्येष्ठ नागरिकांची मतेही त्यांनी आपल्याकडे वळवली. त्यातील अर्धे मला मिळाली असती तर त्यांचा पराभव निश्‍चितच होता असे त्यांनी मत व्यक्त केले.

यावेळी झालेल्या चर्चेवेळी अनेक पराभूत उमेदवारांनी काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी ऐनवेळी दगा दिल्याने पराभवाला सामोरे जावे लागले अशा तक्रारी केल्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्याचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. तो पक्षाच्या केंद्रीय समितीला
पाठवून दिला जाणार आहे. पक्षाचा विधीमंडळ नेता वा विरोधी पक्षनेता केंद्रीय समितीमधील ज्येष्ठ नेते निर्णय घेतील अशी माहिती आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com