अज्ञातानं कचऱ्याला लावली लाग, अडीच लाखांचे नुकसान

आग लावणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Unidentified person set fire to garbage in Bandoda Panchayat area causing loss of Rs
Unidentified person set fire to garbage in Bandoda Panchayat area causing loss of RsDainik Gomantak
Published on
Updated on

बांदोडा पंचायत इमारतीच्या मागे ठेवण्यात आलेल्या कचऱ्याला अज्ञातांनी शनिवारी दुपारी आग लावली असल्याचे बोलले जात आहे. आग लावणारा संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सरपंच राजेश नाईक यांनी याप्रकरणी पोलिसांत (police) तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

Unidentified person set fire to garbage in Bandoda Panchayat area causing loss of Rs
मग पाकिस्तान भारताचे क्षेपणास्त्र 'का' पाडू शकला नाही?

दरम्यान, शुक्रवारच्या आग दुर्घटनेमुळे सोनसोडोवरील बेलिंग मशीन व विद्युतीय व्यवस्था नष्ट झाल्याने मडगाव नगरपालिकेने आता गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचे दरवाजे ठोठावून व्यापारी राजधानीतील सुका कचरा (Garbage) तूर्त साळगाव येथील प्रकल्पामध्ये हलवावा, अशी विनंती केली आहे.

याच प्रयत्नात पालिकेने (Municipality) आणखी एक पत्र गोवा (goa) राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पाठवून या सुका कचरा स्थलांतरासाठी ना हरकत दाखला देण्याची विनंती केली आहे. दररोज दहा टन कचरा उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. पालिका मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी ही पत्रे महामंडळ व प्रदूषण मंडळाच्या सदस्य सचिवांना पाठविली आहेत.

शुक्रवारच्या दुर्घटनेचा तपशील देऊन वीज खात्याच्या उच्च दाबाची तार तुटून शॉर्ट सर्किट होऊन आगीचा हा भडका उडाल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com