National Highway 66: राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण करणाऱ्या कंत्राटदारास तात्काळ अटक करा; काँग्रेस आक्रमक

Goa Congress: महामार्ग विस्तारीकरणाचे झालेले हलक्या दर्जाचे काम पाहता संबंधित कंत्राटदारास तात्काळ अटक करावी आणि त्यास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
National Highway 66: राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण करणाऱ्या कंत्राटदारास तात्काळ अटक करा; काँग्रेस आक्रमक
Yuri AlemaoDainik Gomantak

‘राष्ट्रीय महामार्ग-66’च्या कंत्राटदाराचा पूर्ण निष्काळजीपणा आणि सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेले अपयश, तसेच पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतच्या महामार्ग विस्तारीकरणाचे झालेले हलक्या दर्जाचे काम पाहता संबंधित कंत्राटदारास तात्काळ अटक करावी आणि त्यास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार एल्टन डिकोस्टा, सरचिटणीस ॲड. जितेंद्र गावकर, उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, पेलाजिया पिरीस यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी न्हयबाग आणि धारगळ येथील भूस्खलनाच्या ठिकाणी भेट दिली.

National Highway 66: राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण करणाऱ्या कंत्राटदारास तात्काळ अटक करा; काँग्रेस आक्रमक
National Highway 66: पोरस्कडे जंक्शन मृत्यूचा सापळा; त्वरित सर्कल उभारण्याची मागणी

महामार्ग विस्तारीकरण कंत्राटदार एमव्हीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने केलेल्या कामांच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा काँग्रेस (Congress) पक्ष सातत्याने उपस्थित करत आहे. या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. आपण जुलै 2022 मध्ये अशाच एका भूस्खलन स्थळाला भेट दिली होती आणि रस्त्यालगत पुरेशी ड्रेनेज व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

National Highway 66: राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण करणाऱ्या कंत्राटदारास तात्काळ अटक करा; काँग्रेस आक्रमक
Goa Highway: राष्ट्रीय महामार्ग 66 चे होणार रूंदीकरण; संपादित जमिनीचे सर्व्हेक्षण सुरू

‘कंत्राटदाराचे सर्व प्रकल्प निकृष्ट दर्जाचे’

ठेकेदारावर भाजप (BJP) सरकार कोणतीही कारवाई करत नाही. कारण तो भाजपच्या सर्वोच्च नेत्याचा जावई आहे. या कंत्राटदाराने केलेले सर्व प्रकल्प निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com