National Highway 66: पोरस्कडे जंक्शन मृत्यूचा सापळा; त्वरित सर्कल उभारण्याची मागणी

अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
National Highway 66
National Highway 66Dainik Gomantak

National Highway 66: राष्ट्रीय महामार्ग-६६ वरील भटपावणी-पोरस्कडेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जंक्शनवर कसल्याच प्रकारचे सर्कल किंवा भूमिगत रस्ता नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ओलांडणे धोकादायक बनले आहे. हे ठिकाण अपघात क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

या ठिकाणी लवकरात लवकर सर्कल उभारावे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा भटपावणी-पोरस्कडे, न्हयबाग येथील नागरिकांनी दिला आहे.

National Highway 66
Mahadayi River: ‘कळसा-भांडुरा’चे काम त्वरित सुरू करा! बेळगावात मागणी

मंगळवारी या ठिकाणी इजिदोर फर्नांडिस, एकनाथ तेली, मधू पालयेकर यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. या महामार्गाचे काम एमव्हीआर कंपनी करत आहे. कंत्राटदार मनमानी पद्धतीने या रस्त्याचे काम करतो. रस्ता कशा प्रकारचा केला जात आहे, त्याचा आराखडा कुठल्याच पंचायतीकडे नाही.

ज्या ठिकाणी भूमिगत रस्ते, उड्डाण पूल आवश्यक होते, त्या ठिकाणी ते उभारलेले नाहीत. सर्व्हिस रोड करण्यापूर्वीच महामार्गाच्या रुंदीकरणाला हात घातला आहे. काही ठिकाणी जंक्शन आहे, तिथं सर्कल नाही. दिशादर्शक फलक लावलेले नाहीत किंवा सिग्नल लावलेले नाही, असा लोकांचा आरोप आहे.

भोंगळ कारभाराकडे दुर्लक्ष

रस्त्याच्या बाजूला जे डोंगर आहेत, ते सरळ रेषेत कापले गेले. त्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. या कामाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे पत्रादेवी ते धारगळ महाखाजनपर्यंत रस्ता काही ठिकाणी खचला गेला.

काँक्रिट निघाले आहे. हा रस्ता खरोखरच काँक्रिटचा आहे की डांबराचा तेच कळत नाही. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर अंधार असतो. दिव्यांची सोय केलेली नाही. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत.

ठराव पाठवला; कार्यवाही नाही

सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी सर्कल उभारून गैरसोय दूर करावी. अन्यथा रास्ता रोको करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. यासंदर्भात पोरस्कडे पंचायतीने ठराव घेऊन संबंधित खात्याला पाठवला आहे. स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनाही निवेदन सादर केले आहे. त्या जंक्शनवर कुठले वाहन कुठे जाते, काहीच कळत नाही. तसेच या ठिकाणी दिवसभर ट्रॅफिक पोलिस तैनात करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com