CM Pramod Sawant: लैंगिक अत्याचाराच्या कारणाविषयी मुख्यमंत्री स्पष्टच बोलले; वाचा सविस्तर...

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेमुळे मुलींचा जन्मदर वाढला
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून अनेकदा महिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला जात असतो. पण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मात्र लैंगिक अत्याचाराच्या घटनांमागचे नेमके कारणच स्पष्टपणे सांगितले आहे.

मुलांवर योग्य संस्कार न केल्यानेच महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असतात, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

CM Pramod Sawant
Quepem Crime News: केपे येथे गाडीवर रंग टाकल्यावरून युवकावर जीवघेणा तलवार हल्ला

गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पालकांनी आणि घरातील ज्येष्ठांनी मुलांना मुली-महिलांचा आदर करायला शिकवले पाहिजे.

महिलांबाबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये, अशी शिकवण दिली पाहिजे. मुलांवर योग्य संस्कार न केल्यानेच महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असतात.

ते म्हणाले, बऱ्याचदा स्त्री-पुरूष भेदभावाला स्त्रीयादेखील कारणीभूत असतात. मुलीच्या जन्मावेळी जिलेबी आणि मुलाच्या जन्मावेळी पेढा असा भेदभाव कशासाठी? मुलगीच्या जन्मानंतरही पेढाच का वाटला जात नाही? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

CM Pramod Sawant
Goa BJP: इंधन दरवाढीचे समर्थन, भाजपच्या महिला नेत्याकडून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ

दरम्यान, महिलांना राजकीय आरक्षणाबाबतही मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, महिलांना राजकीय आरक्षणाचे मी स्वागतच करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याधीच महिलांना अनेक गिफ्ट दिली आहेत.

केंद्राच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेमुळे स्त्री पुरूष जन्मदराच्या गुणोत्तरात सकारात्मक वाढ झाली.

ते म्हणाले, मोदींनी दिलेले दुसरे गिफ्ट म्हणजे घरोघरी स्वच्छतागृह. गोव्याने देखील यात मोठे यश मिळवले आहे. पीएम जनऔषधी योजनेतून अशा दुकानांमधून महिलांना एक रूपयात सॅनिटरी नॅपकीन दिला जात आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com