Indian Science Film Festival : आठवा भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव आजपासून पणजीत

विविध चित्रपटांची मेजवानी : सामान्य प्रेक्षकांसाठी उद्या सायंकाळी ‘ओपन शो’; डॉ. सतीश शेणॉय यांची उपस्थिती
Inaugural function Science Film Festival of India
Inaugural function Science Film Festival of India Dainik Gomantak
Published on
Updated on

येथील गोवा मनोरंजन संस्थेत आठवा भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव मंगळवार(ता.18)पासून सुरू झाले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी विज्ञान भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सतीश शेणॉय हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

हा महोत्सव 18 ते 20 एप्रिल या कालावधीत विज्ञान परिषद, गोवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, गोवा, विज्ञान प्रसार (डीएसटी, भारत सरकार), गोवा विद्यापीठ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, नॅशनल कौन्सिल फॉर पोलार अँड ओशन रिसर्च, सेंट्रल कोस्टल अग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि गोवा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

Inaugural function Science Film Festival of India
Goa Two Wheelers Stunt: गोव्यातील रस्त्यावर तरूणाचा दुचाकीवरून धोकादायक स्टंट

या तीन दिवसीय महोत्सवात वैज्ञानिक चित्रपटांचे प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, शिक्षकांसाठी विज्ञान चित्रपट कार्यशाळा, कोडिंग आणि रोबोटिक्स कार्यशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आणि नामवंत शास्त्रज्ञांशी संवाद होणार आहे.

सामान्य प्रेक्षकांसाठी आयोजकांतर्फे बुधवार, 19 रोजी सायंकाळी 6 वाजता एक ‘ओपन शो’ आयोजित केला असून ज्यामध्ये सायबर क्राईमवर आधारित ‘टेक केअर गुड नाईट’ हा मराठी चित्रपट आयनॉक्स स्क्रीन १ येथे दाखविला जाईल, अशी माहिती विज्ञान परिषद, गोवाचे अध्यक्ष सुहास गोडसे यांनी दिली.

चित्रपट असे

  • एआय

  • टेक केअर गुड नाईट

  • अटॅक

  • अवतार - 2

  • कीदम

  • कॉन्टॅक्ट

Inaugural function Science Film Festival of India
Goa Congress : ‘लघुउद्योजकांचा हक्क भाजपने हिसकावला’; काँग्रेसचा सरकारवर आरोप

विज्ञान महोत्सवाचे आकर्षण

स्टुडंट्स सायन्स व्हिलेज : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात विज्ञानविषयक क्रियाकलाप, प्रात्यक्षिके, सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, ओल्ड गोवा या संस्थांना भेट आणि चित्रपट प्रदर्शन यांचा समावेश आहे. हे विशेषतः राज्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले असून यामध्ये राज्यभरातील 180 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

भारतीय ज्ञानप्रणालीवर कार्यशाळा : भारतीय ग्रँड नेरेटिव्ह, नैसर्गिक सामर्थ्य आणि प्रतिभा समजून घेणे, धरमपालच्या कार्याची प्रासंगिकता - आधुनिक काळातील सुंदर वृक्ष, हिंदू धर्मग्रंथानुसार वेळेची संकल्पना या विषयांवर विशेष सत्र आयोजित केले आहे.

रील मेकिंग वर्कशॉप : अशास्त्रीय घटनांमागील सत्य समोर आणण्यासाठी सोशल मीडिया एक उपयुक्त साधन बनत आहे. या सत्राचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाची प्रगती करण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करता येईल हे दाखविणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com