Goa Congress : ‘लघुउद्योजकांचा हक्क भाजपने हिसकावला’; काँग्रेसचा सरकारवर आरोप

व्यावसायिकांना सरकारने मोबदला द्यावा, काँग्रेसची मागणी
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

एका बाजूला ‘जी-20’ शिखर परिषदेच्या नावाखाली भाजप सरकार कॅसिनोंच्या जाहिराती झाकत आहे, परंतु कॅसिनो बंद करीत नाही, तर दुसऱ्या बाजूला शहरातील लघुउद्योग करणाऱ्यांना हटविले गेले आहे, हा त्यांच्यावर अन्याय असून त्यांचा उदरनिर्वाहाचा हक्क भाजपने हिसकावून घेतल्याचा आरोप सोमवारी काँग्रेसने केला.

काँग्रेस भवनाजवळ झालेल्या पत्रकार परिषदस एल्विस गोम्स, लवू मामलेदार, ॲड. हृदयनाथ शिरोडकर, महेश म्हांबरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Goa Congress
Goa Lok Sabha Election 2024: लोकसभेवेळी राजकीय पक्षाला नव्हे, उमेदवाराला पाठिंबा : किरण कांदोळकर

गोम्स म्हणाले, तीन दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभर साजरी झाली. सरकारनेही ती साजरी केली, पण ज्या घटकांसाठी डॉ. बाबासाहेबांनी लढा दिला त्या घटकांवर अन्याय करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे.

छोट्या व्यवसायांना बंद करण्यास का सांगितले, असा सवाल करून या व्यावसायिकांना त्यांचा मोबदला सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Goa Congress
Goa Two Wheelers Stunt: गोव्यातील रस्त्यावर तरूणाचा दुचाकीवरून धोकादायक स्टंट

गोम्स म्हणाले, बुट पॉलिश करणारे, नारळ पाणी विक्रेते आणि इतरांसह लहान व्यवसायांना त्यांचा व्यवसाय बंद करण्यास सांगितले आहे. एका बाजूला कॅसिनो चालतो, परंतु छोट्या व्यवसायांची सरकारला लाज का वाटते? असा सवाल त्यांनी केला.

सुरक्षेच्या नावाखाली राज्य सरकारने रस्त्यावरील सर्वसामान्यांचा उदरनिर्वाहाचा हक्क हिरावून घेतला आहे. या छोट्या व्यावसायिकांना काढायचेच होते, तर त्यांना विश्‍वासात घेऊन सांगायला हवे होते.

पोलिसांचा धाक दाखवून त्यांना हटविण्याची गरज नव्हती. त्यांचे दररोजचे होणारे नुकसान कोण भरून देणार? असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही आपले मत मांडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com