Goa Two Wheelers Stunt: गोव्यातील रस्त्यावर तरूणाचा दुचाकीवरून धोकादायक स्टंट

व्हिडिओ व्हायरल
Goa Two Wheelers Stunt
Goa Two Wheelers StuntDainik Gomantak

Goa Two Wheelers Stunt: गोव्यातील रस्त्यांवर रात्री दुचाकीवरून धोकादायक स्टंट करतानाचा एका तरूणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात हा तरूण दुचाकीच्या सीटवर उभा राहून ही दुचाकी चालवताना दिसतो. याचा व्हिडिओ त्याच्या मागे धावणाऱ्या बाईकवरून काढण्यात आलेला आहे.

Goa Two Wheelers Stunt
गोव्यात जाऊन ईद साजरी करणार होते; खंडणी न दिल्याने दुकानदारावर चौघांचा चाकू हल्ला

अशा प्रकारचे स्टंट काही तरूणांकडून गोव्यातील रस्त्यांवर वारंवार होत असल्याची माहिती आहे. त्यातून अपघात होण्याची शक्यता असून स्वतःसह इतर वाहनधारकांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

संबंधित तरूण गोव्याचा आहे किंवा नाही, याबाबत काही माहिती कळू शकलेली नाही. तथापि, तो चालवत असलेल्या दुचाकीवर मात्र गोव्याचा क्रमांक असल्याचे दिसून येते.

गोव्यात काही दिवसांपुर्वीच काही पर्यटक 'रेंट अ कार'मधून धोकादायकरित्या प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर असाच आणखी एक प्रकार झाला होता आणि त्यावर एका स्थानिकाने तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com