Bicholim: डिचोली परिसरात दीड हजार भाडेकरूंची पडताळणी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोहीम तीव्र

Goa Tenant Verification: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गोव्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. डिचोली पोलिस स्थानकाच्या क्षेत्रात कोंबिंग ऑपरेशन जोरात सुरू आहे.
Bicholim
BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गोव्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. डिचोली पोलिस स्थानकाच्या क्षेत्रात कोंबिंग ऑपरेशन जोरात सुरू आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. दीड हजार भाडेकरूंची पडताळणी करण्‍यात आली आहे.

रोलिंग मिल, आयडीसी आदी काही ठरावीक भागात भाडेकरूंची संख्या मोठी आहे. पहलगाम हल्ल्यानंतर विविध भागात राहणाऱ्या भाडेकरूंची पडताळणी करण्यात येत आहे. गेल्या पाच दिवसांत दीड हजाराहून अधिक भाडेकरूंची पडताळणी करण्यात आली आहे. शिवाय जवळपास ६०० कामगारांची पडताळणी करण्यात आली असल्‍याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्‍यात आली.

Bicholim
Goa Federation Onion Scam: 35 रुपये किलोने कांदा घेऊन चढ्या दराने विकला, गोवा फेडरेशनचे 'एमडीं'चे निलंबन

ज्या भाडेकरूंकडे आवश्यक ओळखपत्र आदी कागदपत्रे नाहीत, त्यांना ४१ कलमाखाली ताब्यात घेऊन नंतर कायदेशीर प्रक्रिया करून सोडण्यात येत आहे. डिचोली पोलिस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व भाडेकरूंची पडताळणी पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Bicholim
Goa Politics: "हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांनाच एकसमान मानतो, समतोल विकास हाच आमचा ध्यास"; कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

सुरक्षा यंत्रणा सतर्क

महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणाऱ्या सीमेवरील दोडामार्ग येथील पोलिस तपासणी नाक्यावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दोडामार्ग येथे रात्रंदिवस सुरक्षा यंत्रणेकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या तसेच महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या राज्याबाहेरील वाहनांवर जास्‍त लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com