Bicholim News : 10 दिवसांपासून केळबाई देवीचे मंदिर बंद: दरवाजा उघडेपर्यंत नामजप करणार, महिला आक्रमक

नाईक गावकर गटातील महिलांचा संकल्प
श्री देवी केळबाई देवस्थान
श्री देवी केळबाई देवस्थानDainik Gomantak
Published on
Updated on

बंदावस्थेत असलेले मये येथील श्री केळबाई देवीचे मंदिर त्वरित खुले करुन भाविक भक्तांना देवीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधी द्यावी, अशी मागणी नाईक गावकर गटातील लोक करीत आहेत.

दुसऱ्या बाजूने मंदिराचा दरवाजा उघडेपर्यंत नित्यनेमाने देवीचा नामजप करण्याचा संकल्प मयेतील नाईक गावकर गटातील महिलांनी केला आहे. मंदिर खुले करण्याची मागणीसाठी भाविकांचे प्रयत्न सुरू आहेत.

श्री देवी केळबाई देवस्थान
New Wetlands in Goa: गोव्यातील आणखी 24 पाणवठे 'वेट लँड' म्हणून घोषित होणार; जाणून घ्या ठिकाणे...

मंगळवारपासून (ता. 4) महिलांनी या संकल्पाचा श्रीगणेशाही केला. मंगळवारी रात्री या महिलांनी तासभर बसून श्री केळबाई देवीचा नामजप केला. या उपक्रमात ज्येष्ठ महिलांनीही सहभागी होताना देवीचे नामस्मरण केले. दरम्यान, मंदिर बंद प्रकरणाची सरकारने आतातरी दखल घेवून देवस्थान ताब्यात घ्यावे. अशी मागणी या महिलांनी केली आहे.

अधिकाराच्या वादातून श्री केळबाई देवीचे मंदिर बंद करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून मंदिराचा दरवाजा उघडलेला नाही. मंदिर बंद केल्यापासून महिलांसह नाईक गावकर गटातील लोक नित्यनेमाने मंदिरात जमा होत आहेत. एकदाचे मंदिर खुले व्हावे आणि सर्व भक्तांना देवीचे दर्शन व्हावे. अशी या लोकांची मागणी आहे.

श्री देवी केळबाई देवस्थान
KTC New Buses For G20 Summit: गोव्यातील G20 बैठकीच्या पार्श्वभुमीवर 'कदंबा' खरेदी करणार मोठ्या आकाराच्या नवीन 100 बसेस

गेल्या दहा दिवसांपासून मंदिर बंद असून देवी केळबाई माता काळोखात आहे. हा भक्तांवर अन्याय आहे. याप्रकरणी तोडगा काढण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. आता आम्ही भक्तांनी करावे तरी काय? सरकारने आमचा अंत न पाहता देवस्थान समिती बरखास्त करून विनाविलंब मंदिर खुले करावे.

- सुजाता पत्रे, स्थानिक.

मंदिर बंद करून संबंधितांनी अन्याय केला आहे. प्रशासनाकडे मागणी करूनही मंदिर उघडण्यासाठी कोणत्याच हालचाली होत नाहीत. कोणालाच काही पडलेले नाही. सरकारने याप्रश्नी तातडीने लक्ष घालून तमाम भक्तांना न्याय द्यावा..

- दीपिका नाईक, स्थानिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com