ED Goa: ईडीची गोव्यात मोठी कारवाई; बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणी 1.2 लाख चौरस मीटर जमीन घेतली ताब्यात
Enforcement Directorate Dainik Gomantak

ED Goa: ईडीची गोव्यात मोठी कारवाई; बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणी 1.2 लाख चौरस मीटर जमीन घेतली ताब्यात

Illegal Mining Activities: चुरीमोल्ला सर्व्हे नंबर 138/0 येथील अनुक्रमे 68,500 चौरस मीटर आणि 51,500 चौरस मीटर जागेचा ताबा ईडीने घेतला आहे.
Published on

पणजी: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पणजी येथील विभागीय कार्यालयाने चुरीमोल्ला येथील 1.2 लाख चौरस मीटर स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जमिनीचा ताबा घेतल्याची घोषणा कार्यालयाने सोमवारी केली. राज्यातील कथित बेकायदेशीर लोह खनिज खाण उत्खनन प्रकरणी मनी लाँडरिंग कायदा (PMLA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

मॅग्नम मिनरल्स लिमिटेड यांच्याशी निगडित असलेल्या चुरीमोल्ला सर्व्हे नंबर 138/0 येथील अनुक्रमे  68,500 चौरस मीटर आणि 51,500 चौरस मीटर जागेचा ताबा ईडीने घेतला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने मे २०२३ मध्येच मालमत्ता जप्त केली होती दरम्यान, आता ताचा ताबा घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

ED Goa: ईडीची गोव्यात मोठी कारवाई; बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणी 1.2 लाख चौरस मीटर जमीन घेतली ताब्यात
EDC Loans 2024: ‘ईडीसी’कडून 2024 मध्ये 190 व्यावसायिकांना कर्ज; 100 कोटी पेक्षा जास्त रक्कम वितरित

अंमलबजावणी संचालनालयाने आता पणजी येथील विभागीय कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत ही मालमत्ता विक्री करण्यास, भेट देण्यास, गहाण, तारण किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करण्यास किंवा शुल्क आकारण्यास प्रतिबंधित केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com