Mapusa News: कचरा टाकल्यास म्हापसा पालिका ठोठावणार दंड

Mapusa Palika: बाजारपेठ आणि परिसरातील कचऱ्याची उचल
Mapusa Palika: बाजारपेठ आणि परिसरातील कचऱ्याची उचल
Mapusa Palika Dainik Gomantak

म्हापसा पालिका क्षेत्रात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून त्यातील खाद्यपदार्थ खाण्यासाठी मोकाट गुरे आणि भटकी कुत्रे तो कचरा अस्ताव्यस्त टाकत असल्याचे वृत्त दैनिक ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध होताच पालिकेने त्याची दखल घेत कचऱ्याची उचल केली. तसेच दुकानाबाहेर कचरा फेकणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे.

माजी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ म्हणाल्या की, या ठिकाणी सीसीटीव्ही लावल्याशिवाय कोण कचरा टाकतो, याची माहिती मिळणे कठीण आहे; परंतु पालिकेने सीसीटीव्ही लावण्यासाठी आर्थिक तरतूद केलेली नाही. कारण सीसीटीव्ही लावण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक साईनाथ राऊळ म्हणाले की, बाजारपेठेतील जे व्यापारी दुकानाच्या बाजूला किंवा मोकळ्या जागेत कचरा टाकताना आढळल्यास त्यांना पालिकेकडून जास्तीत जास्त दंड करण्यात येणार आहे. तो प्रसंग येऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करावे.

व्यापाऱ्यांनी कचरा दुकानाच्या बाजूला किंवा इतर ठिकाणी न ठेवता त्यांना कचऱ्याच्या पेट्या दिल्या आहेत, त्यातच कचरा टाकावा. किंवा कचऱ्याच्या मोठ्या पेट्या ठेवल्या आहेत, त्या ठिकाणी टाकावा.

कारवाईसाठी लवकरच मोहीम

म्हापशाच्या नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांना यासंदर्भात विचारले असता, बाजारपेठेतील दुकानदार कचरा पेटीत न टाकता दुकानाच्या बाजूला टाकून जातात. आम्ही अनेकवेळा सांगूनही ते ऐकत नाहीत. त्यावर आम्ही आता त्यांच्याकडून दंड वसूल करणार आहोत. ही मोहीम लवकरच सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Mapusa Palika: बाजारपेठ आणि परिसरातील कचऱ्याची उचल
Mapusa News: रस्ते, गटारांची कामे रखडली; वाहतुकीला अडथळा

रस्त्यावरच फेकतात कचरा

बाजारपेठेमध्ये जे दुकानदार आहेत, ते दुकानातील कचरा रस्त्याच्या बाजूला गोळा करून टाकतात. तसेच चपला विक्री करणारे दुकानदार चपलांचे रिकामे बॉक्स रस्त्याच्या मधोमध म्हणजे ग्राहकांची ये-जा सुरू असते, त्याठिकाणी फेकून देतात. आपल्या दुचाकीही त्या ठिकाणी ठेवत असल्याने ग्राहकांना या मार्गावरून ये-जा करण्यास अडचण होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com