Mopa Taxi Parking Rate: ..अन्‍यथा कुटुंबांसहित आंदोलन करु! टॅक्‍सीचालक संतप्त; मोपावरील वाढीव पार्किंग शुल्क मागे घेण्याची मागणी

Mopa airport taxi protest: मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर टॅक्सी पार्किंग शुल्क ८० रुपयांवरून अचानक २०० रुपये करण्यात आल्याने टॅक्‍सीचालकांनी संताप व्‍यक्त केला आहे.
Mopa airport taxi protest
Mopa airport taxi protestDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर टॅक्सी पार्किंग शुल्क ८० रुपयांवरून अचानक २०० रुपये करण्यात आल्याने टॅक्‍सीचालकांनी संताप व्‍यक्त केला आहे. वाढीव शुल्क तातडीने मागे घ्‍यावे, अन्‍यथा कुटुंबांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा या टॅक्‍सीचालकांसह पेडण्‍याचे माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिला.

टॅक्सीचालकांच्‍या सभेत आजगावकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले, यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेऊन मी बोललो आहे तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार आहे.

चांदेल-हंसापूरचे सरपंच तुळशीदास गावस, शिव वॉरियर्स युनायटेड संघटनेचे अध्यक्ष रामा वारंग, खजिनदार निखिल महाले, योगेश गोवेकर यांनीही विचार मांडले.

Mopa airport taxi protest
Goa Taxi: 'आमच्या पोटावर पाय दिला जातोय'! काणकोणात टॅक्सी व्यावसायिक एकवटले; ‘गोवा माईल्स’विरोधात नगराध्यक्षांना निवेदन

रामा वारंग, अध्यक्ष (शिव वॉरियर्स युनायटेड)

जीएमआर कंपनी टॅक्सी पार्किंगवर मनमानी करत आहे. करार दाखवायला तयार नाही. विमानतळावर रेंट अ कार व बेकायदेशीर गोष्टी चालतात. वाढीव शुल्क मागे न घेतल्‍यास रस्‍त्‍यावर उतरू.

Mopa airport taxi protest
Taxi Driver Assault: गोवा माईल्‍सच्‍या चालकाला मारहाण! टॅक्‍सीचालकांची दादागिरी; पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल

बाबू आजगावकर, माजी आमदार (पेडणे)

मोपा विमानतळासाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या, पण रोजगार मिळाला नाही. जीएमआर कंपनीने मनमानी सुरू केली आहे. लोकांना फसवले जात आहे. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन प्रसंगी विमानतळ आपल्‍या ताब्‍यात घ्‍यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com