Tambdi Surla Temple: तांबडी सुर्ला मंदिरात कचरा शुल्क लागू; परिसराच्या स्वच्छतेसाठी पंचायतीचा नवीन नियम

Garbage Fee Goa: तांबडी सुर्ल या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येक माणसामागे दहा रुपये कचरा शुल्क लावायला सुरुवात केली आहे
 Goa panchayat regulations
Goa panchayat regulationsDainik Gomantak
Published on
Updated on

साकोर्डा: गोवा हे राज्य मुळातच पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये कादंबकालीन तांबडी सुर्ला ह्या मंदिराचा देखील समावेश आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ राहावा आणि कचऱ्याचे नियोजन करता यावे म्हणून आता साकोर्डा पंचायतीने मंगळवार (दि. १ एप्रिल) पासून तांबडी सुर्ल या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येक माणसामागे दहा रुपये कचरा शुल्क लावायला सुरुवात केली आहे.

प्रति व्यक्ती दहा रुपये असे शुल्क लावण्याचा निर्णय

या ठिकाणी मोठ्या संख्येने येणारे पर्यटक तांबडी सुर्ला या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी कचरा फेकत होते आणि हा कचरा उचलण्याचा मोठा खरंच पंचायतीला भरावा लागायचा. पंचायतीने हाच आर्थिक भार कमी करण्यासाठी आता प्रति व्यक्ती दहा रुपये असे शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीमधून पर्यटनस्थळावरील कचरा नियोजन करणं सोपं जाईल असं पंचायतीचं म्हणणं आहे. गृह कराशिवाय पैसे मिळवण्याचे आणखीन कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात भरपूर पैसे खर्च व्हायचे म्हणून पंचायतीने हा निर्णय घेतला आहे.

आमदारांच्या सहकाऱ्याने पोलिसांची मदत...

गेल्या अनेक वर्षांपासून हा नियम लागू करावा अशा चर्चा सुरु होत्या. वेळोवेळी पंचायतीला कचरा नियोजन करण्यासाठी पैशांची कमतरता भासायची आणि यावेळी आमदार गणेश गावकर यांनी पंचायतीला कचरा नियोजनासाठी कर लागू करावा असा तोडगा सुचवला.

 Goa panchayat regulations
Tambdi Surla Temple: गोवा आजही जपतो कदंबकालीन आठवणी..

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मदतीने हा नियम लागू करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पंचायतीला किमान स्वच्छ भारत अभियानांतर्गत आर्थिक मदत मिळायची पण आता ते देखील बंद झालंय पंचायतीजवळ म्हणावा तसा पैसा नाही आणि म्हणूनच मार्ग शोधला असल्याचं पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. पर्यटकांना देखील या उपक्रमाचे स्वागत केले आहे आणि सहभागी होण्याचा उत्साह दाखवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com