गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात अनेक वर्षांपूर्वी कदंब राजाचे राज्य होते, आणि याचा प्रमुख अवशेष म्हणजे तांबडी सुर्ला येथील शंकराचे मंदिर. १३व्या शतकातील हे मंदिर आजही सर्वांना ऐतिहासिक गोव्याची आठवण करून देतं.
एक अख्खा दगड कोरून बनवलेलं हे मंदिर पोर्तुगीज आक्रमणानंतर देखील आपल्या स्थानावर कायम आहे. मंदिराच्या विविध भागांमध्ये कोरीव काम केलेले आहे.
सत्तरी तालुक्यात असलेलं हे मंदिर दाट जंगलात असल्याने परकीय आक्रमणांपासून दूर राहीलं असं म्हणतात. शेजारी वाहणारी नदी आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत रमणीय आहे.
मंदिरात असलेले शिवलिंग देखील जुने आणि दगड कोरून बनवलेले आहे, आणि समोर दगडापासून कोरलेला नंदी पाहायला मिळतो.
महाशिवरात्रीच्या दिवशी इथे अनेक भक्तांची मोठी रांग लागते.
शिवाय इतरत्र दिवशी देखील पर्यटक मोठ्या संख्येत या मंदिराला भेट देतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.